Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लहान मुलांच्या केसांतील कोंडा कमी करण्याचे घरगुती उपाय !

$
0
0

मुलं वयात आल्यानंतर केसात कोंडा वाढण्याची समस्या हळूहळू दिसून येते. त्यानंतर खांद्यावर कोंडा पडलेला दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते. म्हणूनच डरमॅटोलॉजिस्ट डॉ. मनोज खन्ना यांनी सुचवलेले हे उपाय मुलांच्या केसांतील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील.

  • केसातील कोंडा कमी करण्यासाठी टी ट्री ऑईल हा घरगुती उपाय केसातील कोंडा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे त्वचा शुष्क होण्याची समस्या कमी होते. याकरिता 12 थेंब टी ट्री ऑईल, पाऊण कप बदामाचे, ऑलिव्ह किंवा जोजोबा तेलामध्ये मिसळा. त्यामध्ये कापसाचा बोळा भिजवून टाळूवर फिरवा. 30 मिनिटांनंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत.
  • लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅसिड अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे टाळूवर त्याचा रस चोळावा. यामुळे केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते.
  • केस ओले करून त्यावर मूठभर बेकींग सोडा भूरभूरा. त्यानंतर मसाज करा. सौम्य  शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. बेकींग सोड्यामुळे फंगसची वाढ रोखण्यास मदत होते.
  • अर्धे केळं, एक टेबलस्पून दही आणि चार टेबलस्पून बदामाचे तेल एकत्र करून हेअर मास्क बनवा. बोटांनी हलकासा मसाज करून 20 मिनिटांनी केस माईल्ड शाम्पूने स्वच्छ धुवावेत.
  • मुलांचे केस धुण्यासाठी शाम्पूची निवड करताना त्यामध्ये salicylic acid असल्याची खात्री करून घ्यावी. त्या शाम्पूने आठवड्यातून दोनदा केस  धुवावेत.मुलांचा शाम्पू निवडताना डॉक्टरांचा सल्लादेखील अवश्य घ्यावा.
  • केस धुण्यापूर्वी केस थोडे विंचरून घ्यावेत. यामुळे वर-वरचा कोंडा बाहेर पडायला मदत होते. तुम्ही एखादा मेडीकल शाम्पू वापरत नसाल तर किमान मुलांसाठींचे खास शाम्पू अवश्य वापरा.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>