Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

$
0
0

जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. यामुळे काही अंशी त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. मात्र त्रास फारच जुनाट असल्यास त्यावर उपाय म्हणून वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. Consultant Gastroenterologist, Hepatologist & Interventional Endoscopist, Mumbai चे डॉ. वेदांत करवीर यांच्या सल्ल्यानुसार, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये नेमके कोणते बदल करावेत हेदेखील नक्की जाणून घ्या.

  • फायबरयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश वाढवा -

फायबरयुक्त पदार्थांमुळे पोट साफ होण्यास तसेच शौचालाही साफ होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात  फळं, भाज्या, डाळी, धान्य यांचा समावेश वाढवा. मात्र त्यानेदेखील अपेक्षित परिणाम मिळत नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने फायबर सप्लिमेंट्सची मदत घ्या.

  • फायबर सप्लिमेंट्सचा समावेश करा  -

आहारातील फायबर बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरत नसल्यास फायबर सप्लिमेंट्सचा आहारातील समावेश वाढवा. psyllium Husk (Isaphgula) सारखे फायबर सप्लिमेंट घ्या. काही फ्लेव्हर्समध्ये ही पावडर उपलब्ध असते. रात्री झोपण्यापूर्वी 20-30 ग्रॅम पावडर घ्यावी. त्यासोबत भरपूर पाणी प्यावे. यामुळे शौचाला साफ होण्यास मदत होते. हळूहळू तुमच्या गरजेनुसार त्याची मात्रा वाढवा. कारण आहारात फायबर्सचा अधिक समावेश झाल्यास वाढतील हे ’5′ त्रास !

  • व्यायाम करा -

फायबरचा आहारातील समावेश वाढवण्यासोबतच त्यामध्ये काही बदल करणेदेखील आवश्यक आहे. आहाराच्या सोबतीने व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे मसल अ‍ॅक्टिव्हिटी सुधारते. परिणामी शौचाला साफ होण्यास मदत होते.

  • पाणी अधिक प्रमाणात प्यावे  -

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणेदेखील गरजेचे आहे. नियमित 8 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. व्यायाम केल्यानंतर तसेच उन्हाळ्याच्या दिवसात  पाणी अधिक प्रमाणात प्यावे. सोबतीला सूप, फळांचा रस, शहाळ्याचे पाणी यासारख्या पेयांचा आहारात समावेश करावा. या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !

  • नैसर्गिक विधी फार वेळ अडवून ठेवू नका -

अनेकजण नैसर्गिक विधीला जाण्याची इच्छा रोखून ठेवतात. तसेच शक्यतो विधी पूर्ण होतील याची काळजी घ्या. घाई घाईत आटपून बाहेर पडू नका. तसेच सकाळी वॉशरूमला जाण्याची ठराविक वेळ ठरवा. बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे कटाक्षाने आणि वेळीच उपचार सुरू करणे गरजेचे अअहे. अन्यथा त्यामधून अनेक आजार वाढू शकतात. त्रास फारच जुनाट असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित वैद्यकीय उपचारांची मदत घ्यावी. कोणत्या टप्प्यावर बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी उपचार सुरू करणे गरजेचे ठरते ? हेदेखील नक्की जाणून घ्या

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>