साखर-मीठाशिवाय भारतीय पदार्थांना चवच नाही. त्यामुळे आपल्या आहारात त्याचा कमी-जास्त प्रमाणात समावेश केला जातो. मीठाचे पचन झाल्यानंतर त्याचे रूपांतर सोडीयम आणि क्लोराईडमध्ये होते. सोडीयममुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन राखण्यास तर क्लोराईडमुळे पचन सुधारातून आहारातील पोषणद्रव्यं शोषून घेण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. तर साखर हे कार्बोहायड्रेट्सचे एक रूप असून पचनानंतर त्याचे उर्जेत रूपांतर होते. आर्टीफिशिअल किंवा रिफाईन्ड साखर खाल्ल्याने वजनही वाढू शकते. ‘अति तेथे माती’ या नियमानुसार, साखर किंवा मीठही अति खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकते. अति मीठामुळे रक्तदाब, हृद्याचे विकार वाढू शकतात. कळत नकळत तुमच्या आहारात मीठ-साखर अति जाते. त्यातून अनेक आजारांचा धोका वाढतो. हृद्यविकार हे सायलंट किलर असल्याने त्यांना वेळीच ओळखणे कठीण असते.डॉ.संजय कार्ला, Consultant Endocrinologist, Bharti Hospital Karnal & Vice President, South Asian Federation of Endocrine Societies, यांच्या सल्ल्यानुसार साखर, मीठ प्रमाणात खाण्यासाठी या हेल्दी मार्गाने त्यावर नियंत्रण मिळवा.
फळं आणि भाज्या खाव्यात – किमान निम्मी प्लेट फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश असावा. त्यामधून तुम्हांला व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अॅन्टीऑक्सिडंट्स मिळतील. त्यामुळे हृद्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच त्यामधून मिळणारे पोटॅशियम घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवतात तर फायबर घटक प्रोसेस्ड फूड खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करतात. तसेच कोलेस्ट्रेरॉलवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
तुमच्या अवेळी खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवा – चिप्सचे पाकीट किंवा आईस्क्रीम खाण्याच्या इच्छा अनेकांना रोकणं कठीण होते. यामधून शरीराला केवळ अतिरिक्त प्रमाणात साखर किंवा मीठाचा पुरवठा होतो. त्यामुळे कॅलरीज वाढतात. त्यामधून आरोग्यदायी घटकांचा पुरवठा होत नसल्याने खारावलेला सुकामेवा, चिप्स, स्वीटन टी, सोडायुक्त पदार्थ टाळावेत. वेळी अवेळी भूक लागल्यास शक्यतो घरगुती पदार्थांचेच सेवन करावे. सलाड, सॅन्डव्हिच किंवा फळं खावीत.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock