नवरात्री म्हणजे नऊ दिवस नऊ शक्तींचा, नऊ रंगांचा सण साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक दिवशी विशिष्ट रंगांचे कपडे घालून स्त्रीया एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्यामागे धार्मिक कारण आहे की नाही हा वाद बाजूला ठेवून विशिष्ट रंगांचा तुमच्यावर होणारा परिणाम नक्की जाणून घ्या. रंगांप्रमाणेच नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करतात. चूकीच्या पद्धतीने किंवा उपासमार करून केलेले उपवासांमुळे पित्त, डोकेदुखी यासारख्या समस्या वाढवतात. म्हणूनच यंदाची नवरात्री आणि त्यामधील उपवास अधिक आरोग्यदायी पद्धतीने साजरी करण्यासाठी लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय, लातूर येथील आयुर्वेदाचार्य डॉ. कविता लड्डा यांनी तुमच्यासाठी दिलेला हा खास मिल प्लॅन आणि काही डाएट टीप्स नक्की पाळा.
नवरात्रीच्या उपवासामध्ये तुमची उपासमार होणार नाही याची काळजी घ्या. विशिष्ट वेळाने थोडेथोडे पण आरोग्यदायी पदार्थांची निवड करा. फळं, दूध आणि भरपूर पाणी पित रहा. यामुळे शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होईल. उपवासाच्या दिवसात राजगिराचा समावेश अधिक करा. राजगिरा पोटभरीचा आणि पचायला हलका असल्यास उपवासादरम्यान त्रास होत नाही. राजगिर्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये राजगिर्याचा समावेश अवश्य करावा.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कसा असावा तुमचा आहार ?
- *दिनांकः 1 ऑक्टोबर*
सकाळी 7 ते 11 10-15 बेदाणे आणि 4 बदाम
दुपारी 12 ते 2 2 संत्री
दुपारी 2 ते 5 1-2 ग्लास ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा पोळी भेंडीची भाजी ( किंवा तुम्हांला उपवासाला चालत असलेली भाजी)
- *दिनांकः २ ऑक्टोबर*
सकाळी 7 ते 1 1आक्रोड1-2 व 1-2 जर्दाळू
दुपारी 12 ते 2 2 मोसंबी
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा थालीपिठ व कढी/दही
- *दिनांकः ३ ऑक्टोबर*
सकाळी 7 ते 11 1 उकडलेला बटाटा
दुपारी 12 ते 2 अननस
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 काकडी कोशिंबीर व राजगीरा चपाती
- *दिनांकः ४ ऑक्टोबर*
सकाळी 7 ते 11 6 बदाम व 20 चारोळी
दुपारी 12 ते 2 टरबुज
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 राजगिरा लाही व दुध
- *दिनांकः ५ ऑक्टोबर*
सकाळी 7 ते 11 4 खारीक व 4 बदाम
दुपारी 12 ते 2 पपई
दुपारी 2 ते 5 ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा चपाती व लाल भोपळयाची भाजी
- *दिनांकः ६ ऑक्टोबर*
सकाळी 7 ते 11 20 मनुके 4 अंजीर
दुपारी 12 ते 2 डाळिंब
दुपारी 2 ते 5 नारळ पाणी
संध्या 6 ते 8 2 ते 4 राजगीरा लाडू
- *दिनांकः ७ ऑक्टोबर*
सकाळी 7 ते 11 भाजलेले शेंगदाणे व गुळ
दुपारी 12 ते 2 तूपात परतलेले तालमखाणे
दुपारी 2 ते 5 नारळ पाणी
संध्या 6 ते 8 राजगीरा चपाती व राजगीरापानांची भाजी ( किंवा तुम्हांला उपवासाला चालत असलेली भाजी)
- *दिनांकः ८ ऑक्टोबर*
सकाळी 7 ते 11 कॉफी व राजगीरा बिस्कीट
दुपारी 12 ते 2 कोथीबिंरीचा रस
दुपारी 2 ते 5 नारळ पाणी/ताक
संध्या 6 ते 8 राजगीरा पिठाचा उपमा
- *दिनांकः ९ ऑक्टोबर*
सकाळी 7 ते 11 एक वाटी घट्ट दही व मध 2चमचे
दुपारी 12 ते 2 उसाचा रस
दुपारी 2 ते 5 ताक/नारळपाणी
संध्या 6 ते 8 राजगीरा पोळी व काकडीची भाजी
- *दिनांकः १० ऑक्टोबर*
सकाळी 7 ते 11 ओल्या नारळाचा खिस
दुपारी 12 ते 2 सफरचंद
दुपारी 2 ते 5 ताक/नारळपाणी
संध्या 6 ते 8 राजगीरा पोळी व कच्च्या पपईची कोशिबीर