आहारात तूपाचा समावेश केल्याने वजन वाढते हा चूकीचा समज अनेकांच्या मनात असतो. पण खरंच तूपाचं खाणारे लठ्ठ होतात का ? हे नक्की जाणून घ्या. आजकाल सारेच ‘डाएट कॉन्शियस’ झाल्याने आहारातून तूप, तेल टाळतात आणि नकळत मुलांच्या आहारातील त्याचा समावेशही कमी होतो. परंतू लहानपणापासूनच मुलांच्या आहारात तूपाचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने स्तनपानानंतर बाहेरचे खाणे सुरू केल्यानंतर त्यांच्या आहारात तूप मिसळणे फायदेशीर ठरते. तूपामध्ये अनेक प्रकारचे फॅट्स असल्याने त्याचा समावेश टाळला जातो. परंतू डालडा किंवा वनस्पती तूपाऐवजी साजूक तूपाचा आहारातील समावेश फायदेशीर ठरतो. (नक्की वाचा: साजूक तुपाने वाढवा तुमचे सौंदर्य )
साजूक तूपाचा मुलांच्या आहारात समावेश का करावा ?
- बाळाच्या वाढीमध्ये तूप फायदेशीर ठरते. त्यामधील आरोग्यदायी फॅट्स मुलांना उर्जा देतात. सुरवातीच्या ट्प्प्यावर बाळाचे वजन वाढण्यासाठी, शरीर बाळसे धरताना तूप फायदेशीर ठरते. म्हणूनच त्यांच्या आहारात साजूक तूपयुक्त पदार्थांचा समावेश करा.
- लहान मुलांमध्ये वाढ होण्याची प्रक्रिया अधिक झपाट्याने होत असते. त्यामुळे त्यांना तूप आणि त्यामधून मिळणार्या कॅलरीज अधिक फायदेशीर ठरतात. 1 ग्रॅम तूपामधून सुमारे 9 कॅलरीज मिळतात. म्हणूनच जेवणात तूपाची धार मिसळा.
- लहान मुलांची पचनशक्ती संवेदनशील असल्याने ती प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यासाठी तूप फायदेशीर ठरते. तूप पचायला हलके असल्याने त्यामुळे आताड्यांवरही कोणत्याही प्रकारचा दबाव येत नाही.
- पहिल्या वर्षामध्ये मुलांच्या मेंदूचाही विकास होत असतो. अशावेळी योग्य वातावरणाबरोबर पोषक आहाराने मेंदूचा विकास केला जातो. मेदूंचा विकास 60% हा फॅट्सने होतो.DHA या हेल्दी फॅटमुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास अधिक चांगल्याप्रकारे होतो. घरगुती तूपामध्ये DHA अधिक चांगल्याप्रकारे आढळतात. म्हणून मुलांच्या वाढीसाठी घरगुती तूपचा समावेश वाढवा. मग नक्की पहा घरगुती साजूक तूपाची खास रेसिपी !
- तूपातील DHA घटकामुळे मेंदूच्या विकासाबरोबरच दृष्टी सुधारण्यासही मदत होते.
- तूपामध्ये अॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक असल्याने बाळाचे अनेक इंफेक्शनपासून रक्षण करण्यास मदत होते.
- तूपामुळे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स शोषून घेण्याची क्षमता सुधारते. यामुळे बाळ व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेते. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
बाळाला किती प्रमाणात तूप देणं फायदेशीर आहे ?
- तुमच्या बाळाच्या वयानुसार आणि वजनानुसार त्यांच्या आहारातील तूपाचे प्रमाण ठरते.
- अपेक्षित वजनापेक्षा बाळाचे वजन कमी असल्यास तूप थोडे अधिक द्यावे आणि वजन जास्त असल्यास तूप थोडे कमी द्या.
- बाळाला बाहेरचे अन्न सुरू केल्यानंतर दिवसाला 1 टीस्पून तूप द्या.
- बाळ 1 वर्षाचे झाल्यानंतर तूपाचे प्रमाण हळूहळू वाढवत 3-4 चमचे इतके करा.
तूप आरोग्यदायी असले तरीही त्याचा आहारातील समावेश मर्यादीत असणे गरजेचे आहे. अति तूपाने फायदा होण्याऐवजी दुष्परिणाम अधिक होऊ शकतात. तसेच कटाक्षाने केवळ गाईच्या साजूक तूपाचाच वापर करा.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock