Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

चिकनगुनियामध्ये सांध्यांचे दुखणे कसे कमी कराल ?

$
0
0

सांध्यांचे दुखणे हे चिकनगुनियाचे एक प्रमुख लक्षण आहे. डेंग्यू सारख्या आजारामध्ये रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याकडे, बॅक्टेरियल इंफेक्शन कमी करण्याकडे अधिक भर दिला जातो. मात्र चिकनगुनियाच्या समस्येमध्ये तापावर नियंत्रण मिळवण्यासोबतच सांध्याचे दुखणे कमी करणेही गरजेचे असते. प्रत्येक व्यक्तीगणिक सांध्यांचे दुखणे वेगवेगळे असू शकते. काहींना हा त्रास अधिकच वेदनादायी ठरतो. ज्यामुळे चालणेदेखील कठीण होते. म्हणून चिकनगुनियाच्या समस्येमध्ये सांध्यांच्या दुखण्यावर कसे नियंत्रण मिळवावे याबाबतचा खास सल्ला फोर्टीस हॉस्पिटल्सचे फिजिशियन डॉ. प्रदीप शहा यांनी दिला आहे.

सांध्यांचे दुखणे सौम्य स्वरूपाचे असल्यास तुम्हांला पेन किलरच्या गोळ्या दिल्या जातात. त्यासाठी विशिष्ट गोळ्या किंवा औषधं नाहीत. अनेकदा चिकनगुनियाचे निदान झाल्यानंतर पॅरॅसिटॅमोल किंवा कॉम्बिफ्लेमच्या गोळ्या दिल्या जातात.त्यामुळे वेदना, दाह कमी होण्यास मदत होते. तसेच रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधार होण्यास मदत होते.

चिकनगुनिया दरम्यान साध्यांचे दुखणे अधिकच तीव्र असल्यास indomethacin hydrocodone यासारखे दाहशामक औषध दिले जाते. काही दिवसांसाठी स्टिरॉईडसचा डोस सुरू केला जातो. त्रास खूपवेळ राहिल्यास हा डोस अधिक वेळ दिला जातो. ज्यामुळे चिकनगुनियाचा त्रास परत येण्याचा धोका कमी केला जातो. मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्यास हळूहळू औषधाचे प्रमाण कमी केले जाते. औषधांसोबतच सांध्यांचे दुखणे कमी करण्यासाठी हीट पॅकचा वापर केला जातो.

काही इतर औषधांसोबत चिकनगुनियासाठी ही औषधं घेतल्यास काहीवेळेस त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम दिसुन येतात. त्याबाबत वेळीच डॉक्टरांकडून औषधांमध्ये बदल करून घ्यावेत. सांध्यांच्या दुखण्यामध्ये आईस पॅक, आंबट खाणे, थंड वातावरणात फिरणे किंवा शीतपेय पिणे टाळा.
Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles