वाढता ताणतणाव, जीवनशैलीमधील बदल यामुळे तरूणांपासून वृद्धांमध्ये मधूमेह, रक्तदाब आणि हृद्यविकार अशा समस्यांचा धोका वाढला आहे. हृद्यविकाराच्या झटक्यानंतर तात्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे. कारण झटक्यानंतर हॉस्पिटला पोहचण्यापर्यंतचा प्रत्येक मिनिट त्या व्यक्तीसाठी गरजेचा असतो. तीव्र झटक्यानंतर श्वासोश्वास चालू नसणार्या रुग्णाला सीपीआर म्हणजेच cardio-pulmonary-resuscitation मदतीचे ठरते. यामुळे रक्ताभिसरण आणि श्वसन नियमित होऊन पुढील मदत मिळेपर्यंत ती व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता वाढते. सीपीआर अभावी रुग्णाची जीवंत राहण्याची शक्यता 10% नी कमी होते. म्हणूनच जाणून घ्या तुमच्या नजीकच्या व्यक्तीला हृद्यविकाराचा झटका आल्यास कशी आणि केव्हा कराल cardio-pulmonary-resuscitation ची मदत
एखाद्या व्यक्तीला हृद्यविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची तयारी करा.
दरम्यान त्याव्यक्तीचा श्वास, नाडीचे ठोके चालू आहेत का ? याची तपासणी करा. ती व्यक्ती भानावर असल्यास, श्वास चालू असल्यास सीपीआर देऊ नका. जिवंत व्यक्तीला सीपीआर देणं घातक ठरू शकतं.
श्वास, ठोके चालू नसल्यास त्या व्यक्तीचे डोके मागे करून तोंड उघडण्याचा प्रयत्न करा. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते.
त्याव्यक्तीला पाठीवर झोपवून तुम्ही दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाद्वारे व्यक्तीला श्वास द्या.
दोन्ही हात एकमेकांवर जोडून छातीवरील हाडांवर विशिष्ट लयीमध्ये दाब द्या. यामध्ये सुमारे 5 इंच खाली दाब जाईल याची काळजी घ्या. तसेच मिनिटाभरात 103 दाब होतील इतका वेग ठेवा.
त्यानंतर व्यक्तीच्या हृद्याचे कार्य पुन्हा सुरू होते का ते पाहून पुन्हा तोंडाद्वारे श्वास द्या. मात्र यादरम्यान नाक बोटांच्या चिमटीने बंद करा.
त्यानंतर व्यक्तीला एका कुशीवर फिरवा. हळूहळू छाती पुन्हा वर खाली व्हायला सुरवात झाली की तुमचा सीपीआरचा प्रयत्न सफल ठरत असल्याचे समजा.
रुग्णाला पुढील उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करा.