Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कुत्रा चावल्यानंतर कोणते उपचार घ्यावेत ?

$
0
0

रस्त्यावरील कुत्र्या, मांजरांशी खेळणे अनेकांना आवडते. मात्र पाळीव प्राण्यांशी खेळताना काळजी घेणे आवश्यक आहे.अन्यथा काही आजारांचे संक्रमण किंवा पसार होण्याची शक्यता असते. प्रामुख्याने कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज सारख्या आजाराचा धोका वाढतो.या ’4′ पाळीव प्राण्यांमुळे पसरू शकतात हे आजार ! म्हणूनच कुत्र्याने चावा घेतल्यास किंवा त्यांच्या दातांचा, नखांचा ओरखडा पडल्यास तात्काळ उपचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच अशावेळी कोणते प्रथमोपचार करावेत यावर सनशाईन हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. संदीप सोनावणे यांनी दिलेला हा खास सल्ला नक्कीच फायदेशीर ठरेल. (नक्की वाचा :

  • कुत्रा चावल्यानंतर झालेल्या जखमेवर कापड बांधू नका. ती जखम मोकळी ठेवा.
  • जखम पाण्याने स्वच्छ करा. तुमच्या घरी अल्कोहल असल्यास त्याने जखम स्वच्छ करा. त्यामधील अ‍ॅन्टीसेप्टीक घटक परिणामकारक ठरतात. लाळ किंवा धूळ, माती स्वच्छ करण्यास मदत होते.
  • कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानुसार इंजेक्शन घ्या. यामुळे इंफेक्शन रोखण्यास मदत होते.

उपचार कसे कराल ?

कुत्र्याच्या चावा घेण्याच्या तीव्रतेवर डॉक्टर त्यावरील उपचार पद्धती ठरवतात. काही वेळेस केवळ केवळ जखम स्वच्छ केली जाते तर काही जणांमध्ये इंजेक्शन दिले जाते. असे डॉ. प्रदीप शहा सांगतात.

  • लहानसा ओरखडा पडल्यास, केवळ इंजेक्शन दिले जाते. मात्र जखम खोलवर असल्यास अ‍ॅन्टी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचे उपचार सुरू केले जातात.
  • शक्यतो डॉक्टर जखम शिवण्याऐवजी मोकळी ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र चेहर्‍यावर किंवा प्रमुख शारिरीक अवयवांवर जखम असल्यास टाके घातले जातात.
  • घरगुती कुत्रा चावल्यास 3 इंजेक्शनचा डोस   दिला जातो. पहिले इंजेक्शन त्याच दिवशी, दुसरे 3 दिवसांनंतर तर तिसरे 7 दिवसांनंतर दिले जाते.
  • मात्र रस्तावरील कुत्रा चावल्यास 5-7 अधिक इंजेक्शन दिली जातात. 3 र्‍या इंजेक्शननंतर पुढील इंजेक्शन्स आठवड्याभराच्या फरकाने दिली जातात. यामुळे इंफेक्शनचा धोका कमी होतो तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते.

अनेकजण जखमेवर घरगुती उपाय, लोशन लावण्याचा पर्याय निवडतात. परंतू डॉ. सोनावणे यांच्या सल्ल्यानुसार, रेबीजला रोखण्यासाठी इंजेक्शन आणि इम्युनोग्लोबुलिन हे अधिक योग्य उपचार  आहेत.रेबिज हे व्हायरल इंफेक्शन आहे. त्यावर केवळ अ‍ॅन्टी बॅक्टेरियल लोशन लावून फायद्याचे नाही. अ‍ॅन्टीसेप्टीकमुळे इंफेक्शन अधिक वाढू नये म्हणून काळजी घेतली जाऊ शकते. परंतू शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण उपचाराभावी काही वेळेस कुत्रा चावणे हे जीवघेणेही ठरू शकते. त्यामुळे त्याची तीव्रता आणि धोका ओळखण्यासाठी वैद्यकीय मदत गरजेची आहे.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>