सुकामेवा आरोग्यदायी असल्याने त्याचा आहारातील समावेश वाढवण्याकडे अनेकांचा कल असतो. गोडाचे पदार्थ, चिक्की, दूध यामधून किंवा थेट सुकामेवा खाणे हितकारी असते. अवेळी लागणार्या भूकेवर मात करण्यापासून ते थेट बुद्धी तल्लख करण्यासाठी सुकामेवा खाल्ला जातो. परंतू हृद्यरोगींच्या आहारातही सुकामेव्याचा समावेश करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. हार्ट सर्जरीनंतर अक्रोड, बदाम खाणे आरोग्यदायी ठरते असा सल्ला एशियन हार्ट इन्सस्टीट्युटचे हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ प्रिव्हेन्टीव्ह कार्डियोलॉजी अॅन्ड रिहॅबिटेशन डॉ. निलेश गौतम देतात. म्हणूनच हृद्याचे आरोग्य सुधारण्यासाठी सुकामेवा कसा फायदेशीर ठरतो हेदेखील नक्की जाणून घ्या.
1.ओमेगा 3 फॅट्स - माश्यांमध्ये प्रामुख्याने ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळते. पण शाहाकार्यांसाठी सुकामेवा हे ओमेगा 3 फॅटी अॅसिड मिळवण्याचा योग्य पर्याय आहे. त्यामधील कमीतकमी सॅच्युरेटेड फॅट्स आणि अधिक प्रमाणातील पॉलीअन्सॅच्युरेटेड फॅट्स हृद्याचे कार्य सुधारतात. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांचा धोकाही कमी होतो.
2.फायबर - सुकामेव्यातील फायबर घटक कोलेस्टेरॉलचा धोका कमी करतात त्यासोबतच रक्तातील लिपिड लेव्हल सुधारण्यासही मदत होते. फायबर घटकामुळे मधूमेह, लठ्ठपणा, रक्तदाबाची समस्या कमी होते. परिणामी हृद्यविकाराचा धोकाही मंदावतो.
3.अॅन्टीऑक्सिडंट्स - सुकामेव्यात व्हिटॅमिन ईसारखे अॅन्टीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे ह्द्यविकारांचा धोका तसेच छातीत दुखणे, atherosclerosis सारखे तत्सम आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हृद्याचे आरोग्य बिघडवणार्या अनेक घातक घटकांना बाहेर काढण्यासही अॅन्टीऑक्सिडंट्स मदत करतात.
4.L-arginine - फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम यासोबत बदामासारख्या सुकामेव्यामध्ये L-arginine सारखे अमायनो अॅसिड आढळते. यामुळे हृद्याचे कार्य सुधारते. तसेच हृद्याला होणार्या रक्तपुरवठ्यामध्येही सुधारणा होते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते.
5.अनसॅच्युरेटेड फॅट्स - सुकामेव्यातील अनसॅच्युरेटेड फॅट्स स्वास्थ्यकारक असल्याने त्याचा आहारात अवश्य समावेश करावा. यामुळे चांगले कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते. यामुळे हृद्याचे कार्य सुधारते. परिणामी हृद्यविकाराचा धोकाही कमी होतो.
सुकामेवा आरोग्यदायी आहे म्हणून सार्यातच त्याचा समावेश करणे टाळा. दिवभरात केवळ मूठभर सुकामेवा खावा. तुम्हांला हृद्यविकाराचा धोका असल्यास किंवा नजीकच्या काळात तुमच्यावर तत्सम शस्त्रक्रिया होणार असल्यास अधिक कॅलरीयुक्त सुकामेवा खाणे टाळा. काजू, पिस्ता,मनुका अतिप्रमाणात खाऊ नका.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock