छातीत वेदना, अस्वस्थता जाणवणे, श्वास घेताना त्रास होणे, दम लागणे असा त्रास वारंवार जाणवत असल्यास अनेकदा डॉक्टर हृद्यविकाराचा धोका किंवा ब्लॉकेजेसची तपासणी करण्याचा सल्ला देतात. त्यासाठी अॅन्जिओग्राफीची मदत होते. मात्र अनेकांना अॅन्जिओग्राफीतून काय अपेक्षा ठेवाव्यात किंवा त्यामधून नेमके काय समजते याबाबत पुरेशी माहिती नसते. म्हणूनच एशियन हार्ट इन्सस्टीट्युटचे हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ प्रिव्हेन्टीव्ह कार्डियोलॉजी अॅन्ड रिहॅबिटेशन डॉ. निलेश गौतम यांनी दिलेला हा सल्ला नक्की लक्षात ठेवा.
- अॅन्जिओग्राफीच्या दिवशी नेमकी कोणती औषधं घेणं थांबवणं गरजेचे आहे हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे जर तुम्ही मधूमेही असाल तर अॅन्जिओग्राफीच्या दिवशी औषधं घेणं थांबवा. मात्र तुम्ही ब्लड थायनिंगची औषधं घेत असल्यास ती घेण्यास काही हरकत नाही.
- अॅन्जियोग्राफीच्यावेळी दोन तास तुम्ही काहीही न खाणं अपेक्षित असते. त्यामुळे हलका ब्रेकफास्ट करून अॅन्जिओग्राफीच्या चाचणीकरिता जावे. त्या चाचणीपूर्वी भरपेट खाणे टाळा.
- अॅन्जिओग्राफीमुळे हृद्याला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजसचे निदान करता येते. ही चाचणी 15-20 मिनिटांची असते.
- अॅन्जिओग्राफीदरम्यान तुम्हांला लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो. यामुळे तुम्हांला जाणीवा होत असतात. म्हणूनच तुम्ही त्यासाठी तयार नसाल तर त्याची डॉक्टरांना माहिती द्या.
- अॅन्जिओग्राफीच्या निकालावर डॉक्टर अॅन्जिओप्लास्टीचा निर्णय घेतात. शक्य असेल तर तेथेच तो निर्णय घ्यावा. कारण अॅन्जिओग्राफीच्या वेळेस ह्र्द्यात एक ट्युब घातली जाते अॅन्जिओप्लास्टीसाठी त्यामध्ये केवळ एक वायर घातली जाते.
- अॅन्जिओग्राफी केल्यानंतर अॅन्जिओप्लास्टीचा निर्णय तात्काळ घ्यायचा नसल्यास ट्युब काढली जाते. तसेच जेव्हा तो निर्णय घेतला जातो तेव्हा पुन्हा सारी प्रक्रिया पुन्हा केली जाते.
- अॅन्जिओग्राफी हातामधून केली असेल तर दोन तासांमध्ये तुम्ही घरी जाऊ शकतात.मात्र जांघेमधून केले असल्यास सहा- आठ तासांनंतर तुम्ही घरी जाऊ शकतात.
नक्की वाचा : Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे ’5′ संकेत
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock