भारतामध्ये सुमारे 3- 31% लहान मुलं, स्त्रिया आणि वयोवृद्ध लोकांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक प्रमाणात आढळून येत आहे. तसेच बद्धकोष्ठतेच्या त्रासाकडे फार गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. आठवड्यातून तीन वेळापेक्षाही कमी शौचाला जाण्याचा त्रास त्यामध्ये आढळतो. तर 14% लोकांमध्ये जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. यामध्ये सलग तीन महिन्यांहून अधिक काळ हा त्रास त्यांना जाणवतो.
Consultant Gastroenterologist, Hepatologist & Interventional Endoscopist, डॉ. वेदांत कारवीर यांच्यानुसार, बद्धकोष्ठतेचा त्रास हा त्याच्या लक्षणांवरून ओळखला जातो. त्यामुसार किमान दोन किंवा त्याहून अधिक लक्षण आढळल्यास बद्धकोष्ठतेच्या त्रासाकडे लक्ष देणं गरजेचे आहे.
- 25% वेळेस शौचाला होताना खूप ताण आणावा लागत असल्यास
- 25 % वेळेस शौचाला फारच कडक होणं
- 25 % वेळेस शौचाला झाले तरीही पोट साफ न झाल्यासारखे वाटणे
या व्यतिरिक्त गरोदरपणाच्या काळात, हायपर थायरॉईडिझमच्या समस्येमध्ये, काही औषधांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो.
कोणत्या टप्प्यावर बद्धकोष्ठतेच्या समस्येवर उपचार सुरू करणे गरजेचे होते ?
शौचाच्या सवयीमध्ये बदल होणं ही समस्या काही वेळेस व्हायरल, बॅक्टेरियल इंफेक्शन, आतड्यांचा कॅन्सर, आयबीडी ( inflammatory bowel disease) यामुळेदेखील होऊ शकतो. म्हणूनच त्याचे वेळीच निदान करण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या.
- बद्धकोष्ठतेचा त्रास दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहिल्यास
- वरचेवर शौचाला जाण्याची इच्छा होणं
- डायरिया किंवा त्यामधून रक्त पडणं
- काळपट रंगाचे शौचाला होणं
बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यामधून अधिक गंभीर समस्या वाढण्याची शक्यता आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक तीव्र झाल्यास मूळव्याध, अल्सर सारखा त्रास वाढतो.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock