पित्ताचा त्रास होत असल्यास आंबट फळं खाऊ नये असा अनेकांचा समज असतो. मात्र यामध्ये तथ्य नाही असा सल्ला Holistic Nutritionist and Integrative and Lifestyle Medicine expert, Mumbai च्या Luke Coutinho यांनी दिला आहे. अॅसिडीक असणारी फळं खाणं आरोग्यदायी ठरतात. कारण पचन होण्याच्या क्रियेमध्ये त्यामध्ये लाळ मिसळली जाते. परिणामी ते फळही अल्कलाईन होते. त्यामुळे अशाप्रकारची फळं अॅसिडीटीचा त्रास अधिक वाढवत नाहीत. याउलट आंबट फळांचा आहारात समावेश केल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
स्वास्थ्य सुधारण्यासाठी आंबट फळांचा फायदा होतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच लहान बालकांची वाढ होण्यामध्ये फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन सी युक्त फळांमुळे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच सर्दी-पडशाच्या त्रासापासून आराम मिळण्यास फायदा होतो.
गरोदरपणाच्या काळात संत्र, मोसंबी, ग्रेपफूट, किवी यासारखी फळं खाल्ल्यास अॅलर्जीचा धोका कमी होतो. सोबतच फॉलिक अॅसिड सुधारण्यासही मदत होते. यामुळे गर्भाची वाढही सुधारते. आंबट फळांमधील व्हिटॅमिन सी हे एक उत्तम दर्जाचे अॅन्टीऑक्सिडंट आहे. यामुळे फ्री रॅडीकल्सचा धोका कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेचे सौंदर्यही खुलते.
तुम्हांला पित्ताचा त्रास होत असल्यास, फळांचा रस पिणे टाळा. कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक आणि पोषणद्रव्यांचे प्रमाण कमी असते. अशावेळी फळांच्या रसापेक्षा अख्खी फळं खाणं अधिक फायदेशीर ठरतात. त्यामधून शरीराला अधिक फायदा मिळतो. आंबट फळ वगळता इतर फळं रिकाम्या पोटी खाणं अधिक फायदेशीर ठरतात. मिड स्नॅक किंवा अवेळी लागणार्या भूकेवर फळं खाणं हा अधिक फायदेशीर उपाय आहे.यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच त्यामधून मिळणारी पोषणद्रव्य शरीर अधिक चांगल्याप्रकारे शरीरात शोषून घेतले जाते.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock