Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे ’5′संकेत !

$
0
0

कोणताही आजार धोकादायक स्थितीपर्यंत जाण्याआधी शरीर आपल्याला वेळोवेळी त्याचे संकेत देत असतो. परंतू या संकेतांकडे आपल्याकडूनच लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा हृद्यविकाराचे आजार आणि झटका हा सायलंट किलर ठरतो. म्हणूनच लिलावती हॉस्पिटल्सचे कार्डिओलॉजिस्ट डॉ.अजित मेनन यांनी सांगितलेली ही ’5′ लक्षण लहानसहान वाटत असली तरीही त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

1.थकवा/ दम लागणे -

कमी झोपेमुळे, कामचा खूप ताण असल्यास किंवा सतत जंकफूड खाणे  यामुळे काहींना थकवा जाणवू शकतो. परंतू हृद्याचे कार्य कमजोर झाल्याने आलेला थकवा थोडा वेगळा असतो.थकव्यासोबतच दम लागत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. हृद्याच्या कार्यात बिघाड झाल्यास रक्ताभिसरणाच्या कार्यातही अडथळा निर्माण होतो. त्याच्या परिणाम फुफ्फुसांच्या कार्यावरही होतो. त्यामुळे थोडेसे अंतर चालणेही दमछाक करणारे ठरत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

2. छातीतून सुरू होणार्‍या कळा खांदा आणि गालाजवळ जाणावणे

काही वेळेस लहान सहान कारणांमुळे जाणवणारी छातीदुखी ही आराम केल्यानंतर ठीक होते. सतत जाणवणारी छातीदुखी दुर्लक्षित न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डावा हात दुखावण्यामागे, डाव्या बाजूच्या जबड्यामध्ये वेदना जाणवण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्याची वेळीच तपासणी करून योग्य निदान करणे गरजेचे आहे.

3. अपचन

हृद्याचे कार्य हळूहळू कमकुवत होण्याचे संकेत अपचनाचे लक्षण देते. पित्त आणि पचनाचे विकार केवळ पोटाच्या आजारांशी संबंधित राहत नाहीत. आवश्यकतेइतके हृद्याचे पंपिंग न झाल्यास आतड्यांना होणारा रक्तपुरवठाही कमी होतो. यामुळे पचनात बिघाड होतो. परिणामी पित्ताचा त्रास वाढतो. पित्त कमी करण्यासाठी अ‍ॅन्टासिडस घेऊनही त्रास कमी होत नसेल तर कार्डिओलॉजिस्टचा सल्ला  वेळीच घ्यावा.

4. पायांना सूज -

किडनीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास चेहर्‍यावर, हाता-पायावर सूज येते. रक्तप्रवाहाचे काम सुरळीत न झाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहणारे रक्त पायांवर सूज वाढवू शकते.  तसेच हृद्याच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास किडनीवर परिणाम होऊन शरीरातील टाकाऊ घटक बाहेर काढू शकत नाहीत. परिणामी शरीरावर सूज वाढते.

5. ह्रद्याची धडधड वाढणे -

शांत ठिकाणी बसल्यावर  जर तुम्हांला हृद्याचे ठोके ऐकू येत असतील तर हे फार चिंतेचे कारण आहे. मोठ्याने हृद्याची धडधड होणे किंवा त्यामध्ये अनियमितता येणे हे हृद्याच्या कमजोरीचे लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>