Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कुरळ्या केसांचे सौंदर्य खुलवतील या खास टीप्स !

$
0
0

कुरळे केस नीट सांभाळले तर ते नक्कीच हटके लूक देतात. पण त्यासाठी थोडी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा ते शुष्क, निस्तेज दिसू शकतात. म्हणूनच कुरळ्या केसांना सांभाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी Marvie Ann Beck Academy च्या हेअर एक्सपर्ट नंदिनी अग्रवाल यांनी हा खास सल्ला दिला आहे.

1. एरंडेल तेलाने मसाज करा

एरंडेल तेलाचा तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये समावेश करणे फायदेशीर ठरते. केसांना एरंडेल तेल लावल्याने चमक वाढते. तसेच या तेलामुळे केसांवर मुलायम थर निर्माण होतो. तसेच केस फुलण्याची समस्या कमी होते.

कसा कराल एरंडेल तेलाचा वापर -:

  • केसांवर एरंडेल तेलाने हलका मसाज करा. केसांना शाम्पू लावण्यापूर्वी किमान 15 मिनिटे आधी या तेलाने मसाज करा.
  • लिव्ह इन कंडीशनरचा वापर करत असल्यास त्यामध्ये एरंडेल तेल मिसळा.
  • एरंडेल तेलामध्ये कोरफडीचा गर, मध आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांच्या मूळाशी लावा. किमान 15-20 मिनिटे मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.

2.अ‍ॅपल सायडर व्हिनेगर  

किचनपासून तुमच्या ब्युटी किटपर्यंत सार्‍याच ठिकाणी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरते. त्यामधील मॉईश्चरायझिंग़ घटक केसांना मऊसूत करतात.

कसा कराल वापर -:

पावणा कप अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि पावणा कप पाणी एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावा. 15 मिनिटांनंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवावेत.

3.केसांना कोरफड लावा

कुरळ्या आणि फ्रिजी केसांना कोरफड लावल्यास ते सांभाळणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामधील मॉईश्चराईझिंग गुणधर्म अधिक परिणामकारक ठरण्यासाठी त्याचा वापर दह्यासोबत करावा.

कसा कराल वापर

  • दोन टेबलसपून खोबरेल तेल, चार टेबलसपून कोरफडीचा गर आणि तीन टेबलसपून दह्यामध्ये मिसळा. हे मिश्रण अर्धातास केसांना लावा  त्यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.
  • जास्वंदीच्या काही फुलांची पेस्ट करा. त्यामध्ये अर्धा कप कोरफडीचा गर व एक टेबलस्पून  ऑलिव्ह ऑईल मिसळा.
  • दहा मिनिटांनी केस स्वच्छ धुवावेत. याकरिता तुम्ही माईल्ड शाम्पूचा वापर करू शकता.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –MithilaPalkar/Instagram


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>