श्रावण महिन्यांपासून सणांना सुरवात होते. सण आले म्हणजे त्याच्यासोबत गोडाचे पदार्थ आणि सेलिब्रेशन आलेच पाहिजे. सणांचा गोडवा वाढवणार्या मिठाया नकळत तुमच्या शरीरातील कॅलरीजदेखील वाढवतात. मग नक्की पहा तुमच्या आवडत्या मिठाईच्या एका तुकड्यात किती कॅलरीज असतात.
सण असो किंवा नसो गोड खाण्याची हुक्की आली तर झटपट होणारा एक गोडाचा पदार्थ म्हणजे शिरा.पण त्यामध्येही अनेक पदार्थ मिसळून त्याची चव आणि पौष्टिकता वाढवता येते. अननसाचा शिरा हा असाच एक हटके पर्याय आहे.
अननसाचा शिरा अधिक पौष्टीक बनवण्यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी गूळ वापरावा. त्यामुळे शरीराला आयर्नचा पुरवठा होतो. तर अननसामधून व्हिटॅमिन सी मिळते.
अननसाच्या शिर्यासाठी लागणारे साहित्य -:
- 1 कप अननसाची प्युरी
- 3 टेबलस्पून गूळ
- 1 टेबलस्पून तूप
- 1 कप रवा
- 1 कप लो फॅट दूध
- 2 टेबलसपून दूधात भिजवलेले केशर
- अर्धा टीस्पून वेलची पूड
साहित्य :
- कढईमध्ये अननसाच्या पल्पमध्ये 2 टेबलस्पून गूळ मिसळा. हे मिश्रण एकजीव करून मध्यम आचेवर 3-4 मिनिटे एकत्र करा. सोबत हे मिश्रण सतत ढवळत रहा.
- दुसर्या पातेल्यामध्ये तूपावर रवा खरपूस भाजावा.रवा तांबूस रंगाचा झाल्यानंतर गॅस बंद मंद करावा.
- उरलेला गूळ मिसळून मिश्रण पुन्हा 1-2 मिनिटांसाठी परतावे.
- त्यानंतर रव्यामध्ये अननसाचा पल्प आणि दूध मिसळून तयार मिश्रण काही वेळ नीट मिसळून शिजवावे.
- केशराचे दूध मिसळून शिरा परतवा.
- यावर आवडीनुसार सुकामेवा आणि बेदाणे मिसळा.
- शिरा एकजीव झाल्यानंतर गरमागरम सर्व्ह करावा.
बाप्पाच्या नैवेद्याला अननसाच्या शिर्याप्रमाणेच हेल्दी आणि हटके मोदकही जरूर बनवा.