Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

घरात पेस्ट कंट्रोल करण्याचे ’6′विविध पर्याय !

$
0
0

घरात कीटकांचा वावर वाढला की ते अधिकच त्रासदायक ठरते. परिणामी अनेक आजारही पसरतात. त्यामुळे अनेकजण घरात वर्षातून किमान एकदा पेस्ट कंट्रोल करतात. म्हणूनच अल्ट्रा पेस्ट कंट्रोलचे गौतम किचलू यांनी सांगितलेल्या या पेस्ट कंट्रोलच्या पर्यायांची माहिती करून घ्या आणि योग्य निवड करा.

1. ट्रॅप्स :

उंदरांना पकडण्यासाठी अनेकजण ट्रॅप्स / सापळे ठेवतात. उंदरांना घराबाहेर काढण्याचा एक उत्तम पर्याय आहे. काही सापळ्यांमध्ये उंदीर अडकल्यानंतर लगेजच मरतात तर काहींमध्ये ते केवळ अडकतात आणि तुम्ही जीवंत उंदीर बाहेर टाकतात.

2. केमिकल रेपिलंट्स :

काही केमिकल्सदेखील घरातील अनेक लहान मोठे कीटक मारण्यास मदत करतात. यामुळे विशिष्ट कीड्यांचा त्रास टाळण्यास, वाढ रोखण्यास मदत होते. केमिकलयुक्त फवार्‍यांमुळे ते त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे लहान मुलांना त्यापासून दूर ठेवा. तसेच केमिकलयुक्त पेस्ट  कंट्रोल केल्यानंतर सारी जागा स्वच्छ करा.

3. कीटकनाशक :

कीटकांना मारण्यासाठी अनेकदा विषारी कीटनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची निवड काळजीपूर्वक करा. तसेच कीटकनाशक मारताना नाकावर रूमाल बांधा. तसेच स्प्रे केल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.

4. विषारी खाणं Poisoned bait:

मुंग्या, उंदीर यांना मारण्यासाठी नक्कीच अत्यंत फायदेशीर पर्याय आहे. खाण्यासारख्या सदृश्य पदार्थामध्ये किंवा घटकामध्ये विषारी औषध ठेवले जाते. त्यामुळे कीटक, उंदीर ते खाता आणि काही वेळात मरतात.

5. Biological pest control methods (बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल मेथड) :

यामध्ये पर्यावरणावर कोणतेही घातक परिणाम न कीटकांचा नाश करतात. बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलमुळे उपद्रवी कीटकांची तुमच्या घराजवळील वाढ रोखण्यास मदत होते.

6. नैसर्गिक उपाय :  

केमिकलयुक्त कीटकनाशकांपेक्षा नैसर्गिक उपायांचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी घरात डासांना दूर ठेवण्यासाठी काही झाडं लावा. यामुळे नैसर्गिकरित्या त्यांना दूर ठेवण्यास मदत होते. काही तेलांचा वापर केल्यास डास दूर राहण्यास मदत होते.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles