श्रावण महिन्यापासून सणांची रेलचेल सुरू होते. हळूहळू गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी आणि लग्नसराई असे एकामागोमाग एक अनेक सोहळे येतात. आज 21 व्या शतकातही स्त्रीयांची मासिकपाळी ही विटाळ समजली जाते. त्याच्यासोबत वर्षांनुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपरा स्त्रीला अनेक धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवतात. मग मासिकपाळीचा ‘अडथळा’ दूर सारण्यासाठी अनेकजणी बाजारात उपलब्ध असलेल्या Period delaying pills कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतात. पण असे करणे खरंच सुरक्षित आणि योग्य आहे का ? त्याचा आरोग्यावर काही परिणाम होतो का ? या बाबतचा खास सल्ला स्त्रीरोगतज्ञ आणि क्लाऊडनाऊन केअर हॉस्पिटल्सचे मेडिकल डिरेक्टर डॉ. निखिल दातार यांनी दिला आहे.
- Period delaying pills म्हणजे नेमके काय ?
डॉ. दातार यांच्या सल्ल्यानुसार,’नैसर्गिकरित्या प्रत्येक स्त्रीच्या शरीराचे एक विशिष्ट हार्मोनल पॅटर्न ठरलेले असते. त्यानुसार प्रत्येकीची मासिक पाळी ठरते. आणि काही कारणांमुळे ती पुढे-मागे होऊ शकते. मूळातच स्त्रीया मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी ज्या Period delaying pills घेतात त्या पाळी पुढे ढकलण्यासाठी नसून शरीरातील अनियमित हार्मोन्सचे संतुलन कमी करण्याचा एक वैद्यकीय पर्याय किंवा औषध आहे. त्यामुळे जेव्हा स्त्रिया एखाद्या त्या संबंधित आजारावर उपचाराशिवाय आणि स्वतःहून त्याची मात्रा ठरवून गोळ्या घेतात तेव्हा नकळतच त्या शरीरातील ठरलेले हार्मोन्सचे चक्र बिघडवतात.’ मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!
- Period delaying pills घेणे त्रासदायक ठरू शकते का ?
प्रत्येक स्त्रीच्या शारिरीक कुवतेनुसार बदलेल्या चक्राचा , हार्मोनल पॅटर्नचा परिणाम वेगवेगळा दिसून येतो. वर्षातून एकदा घेतलेली गोळी कदाचित आरोग्यावर गंभीर परिणाम करत नाही. परंतू जेव्हा Period delaying pills चा त्रास होत नाही म्हणून वारंवार त्याचा वापर करणे, सवय बनवून घेणं नक्कीच गंभीर ठरू शकते.
- Period delaying pills चा होणारा परिणाम
मासिक पाळी पुढे ढकलणार्यासाठी घेतल्या जाणार्या गोळ्या पिसिओडी सारख्या हार्मोनल असंतुलनातून उत्पन्न होणार्या समस्यांवर उपचार म्हणून दिल्या जातात. त्यामुळे त्याचा वापर इतर सामान्य स्त्रियांनी मुद्दामून करणे कटाक्षाने टाळण्याचा सल्ला डॉ. निखिल दातार देतात.
काही स्त्रियांच्या बाबतीत मासिकपाळी पुढे ढकलल्यानंतर येणार्या पुढील पाळीवर या गोळ्यांचा परिणाम दिसू शकतो. यामध्ये रक्तस्त्राव कमी -जास्त होणे, काही विशिष्ट दिवसांनंतर मध्येच रक्तास्राव होणे असे परिणाम होऊ शकतात. तर काहींमध्ये या गोळ्यांचा परिणाम पुढील अनेक मासिकपाळींच्या चक्रांवर झालेला दिसून येऊ शकतो. ( नक्की वाचा : वेळेच्या आधी मासिकपाळी येण्याकरिता ’8′ घरगुती उपाय)
Image Source: Shutterstock