Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

टाळ्या वाजवण्याचे ’10′आश्चर्यकारक फायदे !

$
0
0

देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात. मानवी शरीरात 340 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यापैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. असे Kairali Ayurveda group चे डॉ. राहुल डोग्रा सांगतात. त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होते.

क्लॅपिंग थेरपी – :

खोबरेल तेल किंवा तीळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यासमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सैलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरते.

सकाळच्या वेळेस 20-30 मिनिटं टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अ‍ॅक्टीव्ह रहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉ डोग्रा देतात.

टाळी वाजवल्यानंतर कोणत्या 5 अ‍ॅक्युपंचर पॉईंटला चालना मिळते  :

1.        Hand valley point

2.        Base of thumb point

3.        Wrist point

4.        Inner gate point

5.        Thumb nail point

या ’5′ पॉईन्ट्सला चालना दिल्यास खालील फायदे होतात -

1. हृद्याच्या आणि फुफ्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.

2. पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.

3. गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.

4. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.

5. टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.

6. क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.

7. क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.

8. क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.  9. मधूमेह, अर्थ्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश,केसगळती, डोळ्यांचे विकार  यासारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.

10. सतत एसीमध्ये बसणारे आणि काम करणार्‍यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>