Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लहान मुलांना त्यांच्या मित्रांकडून होणारा त्रास रोखायला कसे शिकवाल ?

$
0
0

5-7  हे मुलांचे वय फारच कोवळे आणि अवखळ असते. या काळात त्यांच्यामधील आत्मविश्वास, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू घडत असतात. मुलं स्वतःहून काही नवीन गोष्टी शिकत असतात. काही वेळेस मुलांमधील उद्दामपणादेखील या काळात वाढू शकतो. तुमच्याही मुलांच्या संगतीमधील काही मंडळी अशा स्वभावाची असतील तर त्याचा परिणाम तुमच्या मुलांवरही होऊ शकतो. त्यांच्या संगतीमध्ये तुमची मुलं दबू शकतात. अशावेळी नाजूक परिस्थितीत मुलांना कसं समजवावे हे जाणून घेण्यासाठी चाईल्ड सायाकोलॉजिस्ट डॉ. शची दळवी यांनी सुचवलेला हा उपाय नक्की जाणून घ्या.

  • bullying  म्हणजे मुलांच्या गुंडागिरीबद्दल त्यांना माहिती करून द्या. एखाद्या वाईट कामातून किंवा नकारात्मक विचाराने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न म्हणजे मुलांची गुंडागिरी असते. त्यामुळे शाळेत जाण्याच्या ट्प्प्यावर मुलं आली की या बाबत त्यांच्यांशी बोला. म्हणजे त्यांना तशाप्रकारचा त्रास आढळल्यास ते प्रतिकार करू शकतील किंवा तुमच्याशी वेळीच बोलतील.
  • तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये न्युनगंड निर्माण झाल्यास आपोआपच इतरांना त्यांच्यावर वर्चस्व करता येणं सोपं होते. तुमच्या मुलांना अशा परिस्थितीमध्ये अधिक सक्षमतेने प्रतिकार करायला शिकवा. त्यांच्याशी हुज्जत घालण्याऐवजी तेथून आत्मविश्वासाने निघून जायला शिकवा.
  • वादाची परिस्थिती टाळून तो विषय तेथेच संपेल असे होणार नाही. त्यांना खड्या शब्दांत उद्दामपणा सहन केला जाणार नाही याबाबत तंबी द्यायला शिकवा. त्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. तरच हे सुरवातीच्या टप्प्यावर थांबायला मदत होते.
  • योग्य समज देऊनही मुलांची गुंडागिरी थांबली नाही. तर त्यांना  शिक्षकांकडे तक्रार करायला सांगा.
  • गुंडागिरीचा त्रास खूपच तीव्र असेल तर पालकांनी त्यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. त्या मुलांच्या पालकांना भेटून समज द्या. मज्जा म्हनून कोणीही अशाप्रकारचे त्रास देत नाही. त्यामागे काही मानसिक किंवा त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींचा पार्श्वभाग असू शकतो. त्यांना होणारा त्रास ते इतरांवर काढत असण्याचीही शक्यता असते. त्यामुळे त्यांच्यांशी बोलणे गरजेचे आहे.
  • तुमच्या मुलांना त्यांचा आत्मसन्मान जपायला शिकवा. त्यांना त्रास होत असल्यास त्याचा प्रतिकार करायला शिकवा. इतरांच्या दबावाखाली दबून जाऊ नका.

तुमच्याशी गुंडागिरी करणार्‍या मुलांशी कडकपणे वागून हा प्रश्न सुटणार नाही हे जाणून घ्या आणि मुलांनाही समजवा. गुंडागिरी किंवा तसे वागणार्‍या मुलांबद्दल वाईट साईट बोलून त्याबाबत  मन कलुषित करू नका.उलट सांमजस्य वाढवण्यासाठी प्रयत्न करायला शिकवा.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles