पुरेशी काळजी न घेतल्यास कोणालाही आणि कुठेही इलेक्ट्रिकचा शॉक लागू शकतो. शॉक लागल्यानंतर संवेदना कमजोर होण्यापासून ते अगदी काहींना हृद्यविकाराचा झटका येण्यापर्यंत त्रास होऊ शकतो. इलेक्ट्रिसिटीच्या तीव्रतेनुसार मेंदू आणि हृद्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे थेट मृत्यूचा धोका असतो. म्हणूनच अशावेळी इलेक्ट्रिकचा शॉक लागलेल्या व्यक्तीला कशाप्रकारे मदत करणे आवश्यक आहे. याची माहिती असणंदेखील गरजेचे आहे. म्हणूनच कोणते प्रथमोपचार करणे आवश्यक आहे याबाबत फोर्टीस हॉस्पिटल्सचे कन्सलटंट फिजिशियन डॉ.प्रदीप शहा यांनी सुचवलेल्या या खास टीप्स अवश्य लक्षात ठेवा.
इलेक्ट्रिकचा शॉक लागला तर काय कराल ?
- इलेक्ट्रिकचा शॉक लागलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी पुढे सरसावताना आजुबाजूला अवश्य पहा. आसपास लोखंडाचा तुकडा, पाणी यासारखी इलेक्ट्रिक करंट पास करणार्या वस्तू नाहीत. याची खात्री करा. तात्काळ इमरजन्सी हेल्पलाईनला मदत करा.
- ज्या मुळे शॉक लागतोय त्या वस्तूपासून व्यक्तीला तात्काळ दूर करा. पॉवर बटण बंद करा. ज्यामधून विद्युत प्रवाह वाहत नाही अशा वस्तूंचा वापर करून संबंधित व्यक्तीला मदत करा. यासाठी लाकडाचा टेबल, लाकडी काठी वापरा. शॉक लागलेल्या व्यक्तीला थेट हात लावू नका. यामुळे मदत करणार्यालाही शॉक लागू शकतो.
- इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या व्यक्तीला बाजूला केल्यानंतर रिकव्हरी पोजिशनमध्ये ठेवा. याकरिता त्या व्यक्तीला एका कुशीवर ठेवा. हाताने डोक्याला आधार द्या, गुडघे दुमडून हनुवटी वरच्या बाजूला ठेवा. यामुळे व्यक्तीचा श्वासोश्वास चालू आहे. याची खात्री करून घ्या.
- शॉक लागलेल्या व्यक्तीचा श्वास चालू असल्यास आणि लहानशी जखम झाली असल्यास वाहत्या पाण्याखाली ते धुवा. जखम असताना त्यांना ब्लॅंकेटमध्ये गुंडाळू नका.
- रक्तस्त्राव होत असल्यास त्यावर स्वच्छ आणि कोरडा कापड बांधा. किंवा हाताचे प्रेशर वापरून ब्लिडींग थांबवा.
- शॉक लागलेली व्यक्ती श्वास घेत असल्याचे संकेत दाखवत नसल्यास Cardio Pulmonary Resuscitation चा वापर करा. मात्र व्यक्ती श्वास घेत असल्यास CPR चा वापर करू नये.
शॉक लागलेल्या व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय मदत गरजेची असते. ती व्यक्ती सामान्य वाटत असली तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जखम, भाजल्यास किंवा एखादे फ्रॅक्चर असल्यास त्यासंबंधी उपचार करणे आवश्यक आहे. गरजेनुसार रक्ताची चाचणी, इसीजी,एमआरआय किंवा सिटी स्कॅनचा पर्याय सुचवला जातो.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Shutterstock