मधूमेहींना आहाराचे पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित रक्तातील साखरेवर लक्ष ठेवणेही आवश्यक आहे. अशावेळी घरच्या घरी रक्तातील साखरेचे प्रमाण पाहण्यासाठी ग्ल्युकोमीटर मदत करते. म्हणूनच पहिल्यांदा ग्ल्युकोमीटर विकत घेताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात तसेच त्याच्या वापराबद्दल श्रेया डाएबेटीस सेंटरचे मधूमेहरोगतज्ञ डॉ. प्रदीप गडगे यांनी दिलेल्या या खास टीप्स
#1. तुमच्या जवळ, घरच्या घरी ग्ल्युकोमीटर असेल तर दिवसभरात कधीही रक्तातील साखर तपासता येते. तुमच्या कडे ग्लुकोमीटर नसले तरीही नियमित डॉक्टरांकडे जाऊन लॅबमध्ये रक्ताची चाचणी करणे आवश्यक आहे. ते सहाजिकच ग्लुकोमीटरपेक्षा अधिक विश्वसनीय आहे. कारण तुमच्या रक्तातील साखरेची पातळी 70 – 150 mg/dl दरम्यान असेल तर ग्लुकोमीटर अधिक विश्वसनीय माहिती देते. यापेक्षा रक्तातील साखरेची पातळी वर-खाली झाल्यास त्याचे निदान अचूक केले जाईलच अशी खात्री देता येत नाही.
#2. जेवणानंतर आणि पूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण ग्लुकोमीटर चटकन दाखवते. अनेकदा जेवणापूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण 100 – 120 mg/dl असते तर जेवणानंतर हे प्रमाण 140 mg/dl होते. त्यामुळे दोन जेवणादरम्यानचा फरक पाहण्यासाठी ग्ल्युकोमीटर अधिक फायदेशीर आहे.
#3. सामान्य रक्तातील साखरेच्या पातळीपेक्षा म्हणजेच 70 – 150 mg/dl पेक्षा कमी-जास्त झाल्यास तो फरक ग्ल्युकोमीटरकडून अचूक दाखवला जात नाही. तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 150 – 200 mg/dl असल्यास 20 – 30 युनीट्सचा फरक दिसून येतो. मात्र हेच प्रमाण 250 mg/dl पेक्षा अधिक असल्यास 50 – 100 युनीटचा फरक दिसून येतो. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य लॅबमध्ये रक्ताची चाचणी करावी. हा फरक 70 mg/dl पेक्षा रक्तातील साखर कमी असल्यासही आढळून येतो.
#4. ग्ल्युकोमीटर वापरण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत आणि कोरडे करावेत. चाचणी करण्यापूर्वी ग्लुकोमीटरदेखील कापडाने स्वच्छ पुसावे. तसेच स्ट्रीप योग्य प्र्कारे ठेवावी. अन्यथा योग्य निदान होणार नाही.
#5. जेवल्यानंतर लगेजच रक्तातील साखरेची तपासणी करू नये. कदाचित तुमच्या बोटांजवळ डाळ, भाताचे काही कण असू शकतात. ते कार्बोहायड्रेट्स असल्याने निदान चुकू शकते.
Read this in English
Translated By - Dipali Nevarekar