Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली सॅन्डव्हिचेस या ’4′घातक कारणांसाठी टाळा !

$
0
0

घाईत घराबाहेर पडताना अनेकदा सॅन्डव्हिच किंवा रॅप्स हे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळले जातात. अशाप्रकारे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले  पदार्थ खाणे आरोग्यावर दुष्परिणाम करू शकतात. म्हणूनच अशाप्रकारे ठेवलेले पदार्थही का विकत घेऊन खाऊ नये हे जाणून घेण्यासाठी आहारतज्ञ प्रिया काथपाल यांचा हा विशेष सल्ला नक्कीच जाणून घ्या.

1.फ्रीजमधील पदार्थ -:

रस्त्यावर किंवा मॉल्समध्ये मिळणारी अनेक सॅन्डव्हिचेस ही विक्रीपूर्वी बनवून ठेवलेली असतात. त्यामध्ये अंड, मांस किंवा पनीरचा समावेश असतो. ते फ्रेश राहण्यासाठी आणि टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. सामान्यपणे 2-3 दिवसांपेक्षा अधिक काळ पदार्थ फ्रिजमध्ये ठेऊन खाऊ नये. परंतू आपल्याला विकले जाणारे सॅन्डव्हिच कधी बनवले आहे. याची आपल्याला माहिती नसते. साठवलेल्या पदार्थांमधून पोषकतादेखील कमी झालेली असते.

2.तापमान

शिजवलेल्या जिन्नसांचा, भाज्यांचा समावेश असलेली सॅन्डव्हिचेस योग्य तापमानात साठवली नाहीत तर ती लगेजच खराब होऊ शकतात.

3.कॅलरी काऊंट

सॅन्डव्हिचेस किंवा रॅप्स बनवताना त्यामध्ये अधिक प्रमाणात मेयॉनीज, बटर वापरले जाते. यामधून सहाजिकच कॅलरीज वाढतात. त्यामुळे जर तुम्ही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर यामुळे नुकसान होऊ शकते.

4.पॅकेजिंग

प्लॅस्टिकच्या cling film मध्ये पदार्थ गुंडाळून ठेवणेदेखील सुरक्षित नाही. झुरळं, माश्या यांचा किचनमध्ये वावर असतो. त्याप्रमाणेच टोमॅटो किंवा व्हिनेगर यासारख्या अ‍ॅसिडीक पदार्थांमुळे प्लॅस्टिकच्या फिल्मशी रिअ‍ॅक्शन होऊ शकते. यामुळे मॉईश्चर किंवा बॅक्टेरियांची वाढ होते.

टीप्स -:

  • ताजी सॅन्डव्हिच बनवून देणारे स्टॉल्स नसतील तर ताजा बनवलेला डोसा, इडली यासारखा पर्याय निवडा.
  • चित्रपट पहायला गेल्यास मध्यम आकाराचे पॉपकॉर्नचा पर्याय निवडा. तितका तुम्हांला पुरेसा आहे.

Image source: Getty Images


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>