अनेकांना वाटतं की मंत्रोच्चार करणं हे केवळ धार्मिक किंवा अध्यामिक कारण आहे. मात्र तसे नसून मंत्रोच्चारामधून तयार होणारा ध्वनी मन शांत करते तसेच आरोग्यावर परिणाम करते. म्हणूनच त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेण्यासाठी आर्ट ऑफ़ लिव्हिंग चे ध्यानसाधना गुरू भानुमती नरसिंह यांचा हा सल्ला नक्की जाणून घ्या. गायत्री मंत्र पठणाचे 10 आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या.
- सकारात्मक राहण्यास मदत होते -
मंत्रोच्चारामधून ध्वनी निर्माण होतो.त्याचा परिणाम आजूबाजूच्या वातावरणावरही होतो. ते अधिक सकारात्मक होते. यामुळे मनातील नकारात्मक विचार काढून टाकायला मदत होते. तसेच दिवसभर तुम्ही उत्साही राहता.
- मन शांत होते -
मनाची अस्थिरता कमी करण्यासाठी मंत्रोच्चाराचा ध्वनी फायदेशीर ठरतो. परिणामी मनातील असुरी भावना कमी होते. विशिष्ट वेळ पुन्हा पुन्हा तोच ध्वनी ऐकल्याने मनातील चलबिचल कमी होते.
- काळजी कमी होते -
मंत्रोच्चारामागील शक्ती अदृश्य असते. त्याचे नेमके काम कसे होते हे थेट सांगणे शक्य नसले तरीही त्या ध्वनीलयींचा परिणाम आपल्या मनावर होतो. काळजी कमी होते. यामुळे भूतकाळातल्या चिंता, प्र्श्नांवर पुन्हा पुन्हा विचार करत बसण्याचा मानवी सवयीचा त्रास कमी होतो.
- संवाद उत्तम साधता येतो
मंत्रोच्चारामुळे मन शांत होण्यास मदत होते. यामुळे विचारांमध्येही सुस्पष्टता येते. अपुर्या संवादामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात. त्यातून समस्या वाढतात. मंत्रोच्चारामुळे तुमची निरीक्षण क्षमता, ते समजून घेण्याचा आणी व्यक्त होण्याची क्षमता सुधारते. परिणामी तुम्ही अधिक सरलतेने संवाद साधू शकता.
कधी करावा मंत्रोच्चार
सकाळच्या वेळेस मंत्रोच्चारण करणे अधिक चांगले समजले जाते. परंतू तुमच्या सोयीनुसार केव्हाही मंत्रोच्चार केला जाऊ शकतो.
Read This in English