मानवी शरीराचे कार्य सुरळीत चालावे म्हणून पाण्याची अत्यंत गरज असते. पण त्यासाठी नियमित किती पाणी प्यावे? आणि ते प्यायले जाईल यावर लक्ष कसे ठेवावे हा अनेकांसाठी गहन प्रश्न आहे. तज्ञांच्या मते पुरूषांना नियमित 3 लीटर तर स्त्रियांना 2.2 लीटर पाणी आवश्यक आहे. मग तुमची ही नियमित पाण्याची गरज पूर्ण होत नसल्यास किंवा ते वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असल्यास या ’7′ टीप्स नक्कीच फायदेशीर ठरतील. तसेच हे पाणी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 10 ‘आरोग्यदायी’ फायदे ! देखील जाणून घ्या.
मग पहा कशाप्रकारे तुम्ही पूर्ण करू शकाल नियमित सात ग्लास पाणी पिण्याची सवय -:
- पाण्याची बाटली तुमच्या जवळ ठेवा- तुमच्या टेबलाजवळ किंवा बेडजवळ तुमची पाण्याची बाटली ठेवा. तुमच्या नजरेसमोर पाण्याची बाटली ठेवल्यास पाणी पिण्याची, ती बाटली संपावण्याचे तुमचे लक्ष्य नजरेसमोर राहील. (नक्की वाचा : कोमट की थंड पाणी ? निरोगी स्वास्थ्यासाठी कोणता पर्याय निवडाल )
- रिमाईंडर लावा- प्रत्येक तासाला किंवा ठराविक वेळेच्या अंतराने रिमाईंडर लावा. या रिमाईंडरने तुम्हांला पाणी पिण्याची आठवण राहील.
- Stick notes लावा - ऑफिसमध्ये सतत रिमाईंडर लावून ठेवणे शक्य नसल्यास डेस्कवर Stick notes लावा. यामुळे सतत पाणी पिण्याची आठवण आणि सवय होईल. सुरवातीला तुम्ही अधिकाधिक वेळ जेथे घालवता किंवा आवडीच्या जागी लावून ठेवा.
- पाणी पिण्याच्या फायद्यांबाबत स्वतःला सतत समजावत रहा – मुबलक पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार होते. शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. तसेच वजन घटवण्याचा हा एक प्रभावी पर्याय आहे. मग आत्तापासूनच मुबलक पाणी पिण्याची सवय लावा.
- पाण्यामध्ये नॅचरल फ्ल्वेवर्स मिसळा – अनेकांना पाण्याची चव आवडत नाही. सतत पाणी पिण्याची सवय त्यांना कंटाळवाणी किंवा त्यानंतर मळमळ जाणवते. अशांसाठी इन्फ्युज्ड वॉटर हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये आवडीचा फ्ल्वेवर/ स्वाद निवडता येतो. मात्र आरोग्याच्या दृष्टीने लिंबू किंवा मधाची निवड करा.
- व्यायाम - व्यायामाच्या सवयीमुळे पाणी पिण्याची गरज वाढेल. परिणामी त्याची हळूहळू सवय होईल.
- सेल्फ मोटिवेशन- स्वतःला सतत प्रेरित करणं राहणंं हा एक उत्तम पर्याय आहे.यामुळे पाणी पिण्याची सवय ही तुमची सकारत्मक गरज मिळेल. तसेच त्यामधून आपोआपच तुम्हांला पाणी पिण्याची सवयही होईल.
पाण्याचे सेवन कमी झाल्यास अनेक आजार वाढण्यास सुरवात होते. मग किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी नियमित किती पाणी प्यावे? हे देखील नक्की जाणून घ्या.
Reference: 1. Meinders AJ, Meinders AE. [How much water do we really need to drink?]. Ned Tijdschr Geneeskd. 2010;154:A1757. Dutch. PubMed PMID: 20356431.
Image source: Shutterstock
Read this in English
Translated By - Dipali Nevarekar