Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लहान मुलांना सुवर्ण भस्म देण्याचे आरोग्यदायी फायदे !

$
0
0

लहान मुलांची स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आयुर्वेदाने सोन्याचा वापर उपचार म्हणून करावा असा सल्ला दिला आहे. आजही मुलांवर सुवर्णप्राशनाचे संस्कार केले जातात. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे सोन्याच्या भांड्यांत जेवण शिजवत असते. मात्र आजही पातरेवर सोनं उगाळून किंवा पाण्यात घालून दिले जाते.  याबाबतच Neonatology and Child Healthcare Unit च्या डॉ. मधू गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

  • कसे असते सुवर्णप्राशन -

पूर्वीच्या काळी सुवर्ण भस्म किंवा रॉ गोल्ड स्वच्छ धुतलेल्या दगडावर घासले जात असे. त्यानंतर मध आणि तूपासोबत ते मिसळले जाते. हे चाटण लहान मुलांना दिले जाते. तर काही ठिकाणी आयुर्वेदीक हर्ब्ससोबत सुवर्ण भस्म दिले जाते. यामध्ये ब्राम्हीसारख्या वनस्पतींचाही समावेश केला जातो.

  • सुवर्णप्राशनाचे फायदे -

लहान मुलांच्या शारीरीक, मानसिक वाढीबरोबर आजारांना प्रतिकार करण्याची क्षमतादेखील सुधारणे गरजेचे असते. तसेच लहान मुलांमधील अस्थमा, इंफेक्शन तसेच अ‍ॅलर्जिक कंडीशन सुधारणेदेखील गरजेचे असते. यामुळे मुलांची स्मरणशक्तीदेखील सुधारते, एकाग्रता वाढते तसेच आकलनक्षमतादेखील सुधारते. सुवर्णप्राशनाच्या नियमित दरमहा सेवनाने आरोग्य सुधारण्यासोबतच बुद्धी कुशाग्र होण्यासही मदत होते.  तर सहा महिन्यातून एकदा सुवर्णप्राशन दिल्यास मुलांची ग्रास्पिंग पॉवर  ( आकलनशक्ती) सुधारते, मुलं लवकर आणि स्पष्ट बोलायला शिकतात. ऐकण्याची, पाहण्याची क्षमता सुधारते.

  • मात्रा किती असावी ?

लहान मुलांमध्ये म्हणजेच नवजात ते पाच वर्षांच्या मुलांमध्ये दिवसाला 1-3 मिलीग्रॅम सुवर्ण भस्म द्यावे. तसेच हे सकाळी रिकाम्यापोटी द्यावे.

  • दुष्परिणाम

सोन्याच्या सेवनाचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही.
Please note: It is extremely important to check with your doctor before you feed your newborn anything apart from breast milk. The views here are held by the expert and not in any way endorsed by TheHealthSite.com

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

 Image Source: Shutterstock

Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>