21 व्या शतकातही ‘मासिक पाळी’ ही विटाळ समजली जाते. मासिकपाळी दरम्यान स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. अनेक पूजा विधींपासून त्यांना दूर ठेवले जाते. मात्र हौसेखातर किंवा हतबल होऊन काही स्त्रियांना घरातील पूजाविधी किंवा उत्सव पूर्ण करण्यासाठी नाईलाजाने पिरिएड्स पुढे ढकलण्यासाठी औषधगोळ्या घ्यावा लागतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मासिकपाळी पुढे ढकलणार्या गोळ्या उपलब्ध असल्याने त्याचा सर्रास वापर केला जातो. कोवळ्या मुलींनादेखील या गोळ्या दिल्या जातात. त्यामुळे नकळत त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. म्हाणूनच मासिकपाळी पुढे ढकलणार्या अशा गोळ्यांंचा खरंच वापर करावा का ? या बाबत मॅक्स हॉस्पिटल्स, नवी दिल्ली येथील कन्सलटंट गायनॅकोलॉजिस्ट डॉ. उमा वैद्यनाथन यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
1. period delaying pills म्हणजे काय ?
Period delaying pills म्हणजेच मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांंमध्ये progesterone हार्मोन असते. त्यामुळे तुमच्या अपेक्षित तारखेच्या 3-4 दिवस आधीपासून त्या घ्यायला सुरवात केल्यास तुमची मासिकपाळी पुढे जाते.
2. period delaying pills मध्ये काही प्रकार असतात का ?
बाजारामध्ये अनेक period delaying pills उपलब्ध आहेत. त्यापैकी ‘progesterone pills’ सामान्यपणे वापरली जाते. इतरांच्या तुलनेत ती अधिक सुरक्षित आणि परिणामकारक आहे. याशिवाय उपलब्ध असलेल्या गोळ्यांंमध्ये contraceptive pill आणि norethisterone यांचे मिश्रण असलेल्या गोळ्या आहेत.
3. या गोळ्या कशाप्रकारे काम करतात ?
मासिकपाळी चक्राचे दोन भाग केल्यास, पहिल्या टप्प्यात estrogen या हार्मोन्सची निर्मिती होते. यामुळे गर्भाशयाजवळच्या आवरणाची वाढ होते. तर progesterone हे हार्मोन्स दुसर्या टप्प्यात निर्माण होते. यामुळेही गर्भाशयाच्या आवरणाची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे progesterone कमी होते तेव्हा गर्भाशयाजवळील आवरण गळून पडते आणि मासिक पाळी येते. परंतू जेव्हा period delaying pills घेतल्या जातात तेव्हा औषधामधील progesterone घटक आवरण पडू न देता ते लांबवण्याचा प्रयत्न करतात. परिणामी मासिकपाळी लांबली जाते.
4. या गोळ्या कधी घ्याव्यात ?
सामान्यपणे मासिकपाळी लांबवण्यासाठी अपेक्षित दिवसाच्या 3-4 दिवस आधीपासून गोळ्या घ्यायला सुरवात करा आणि तुम्हांला पुढे करायच्या तारखेपर्यंत घेत रहा. मात्र या गोळ्या घेण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ञांंचा सल्ला घ्या. तुमचे वजन, मासिकपाळीमधील अनियमितता तसेच काही समस्यांचा आढावा घेऊनच गोळ्यांचा सल्ला दिला जातो.
5. गोळ्या घेणं थांबवल्यास मासिकपाळी येते का ?
गोळ्या घेणं थांबवल्यास अचानक हार्मोन्सचा पुरवठा बंद होतो. परिणामी रक्तस्त्राव होतो. काहींनी गोळ्या घेणे थांबवल्यास काही तासांत पाळी येते तर काहींना 10-15 दिवसांनंतर पाळी येते. मात्र 15 दिवसांनी पाळी आली नाही तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
6. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे हा उपाय योग्य आहे का ? त्याचा किती दिवस वापर करावा ?
डॉ. उमा यांच्या मते, एखादवेळेस अशा प्रकारच्या गोळ्या घेणे ठीक आहे. मात्र त्याची सवय लावू नका. यामुळे मासिकपाळीचे नैसर्गिक चक्र बिघडते. तुम्हांला हव्या असलेल्या वेळेपर्यंतच गोळ्या घ्या. पाळी पुढे ढकलण्याची सवय वेदनादायी ठरू शकते.
7. period delaying pills या गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणेच असतात का ?
मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आणि गर्भनिरोधक गोळ्या सारख्याच असतात असा अनेकांचा समज आहे. मात्र यामध्ये तथ्य नाही. गर्भनिरोधक गोळ्या ovulation करत नाही. त्यामुळे अनावश्यक गर्भधारणा होत नाही. तर period delaying pills च्या गोळ्यांंमधून गर्भाशयाच्या आवरणावर परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणा रोखता येत नाही.
8. मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचा दुष्परिणाम होतो का ?
अशा गोळ्यांमध्ये progesterone असतात. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम progesterone चे प्रमाण वाढल्यासारखाच असतो. तसेच यामुळे ब्लोटींग. अॅक्ने वाढणे, मूड स्विंग होणं अशा समस्या वाढतात.
9. या गोळ्या यशस्वी परिणाम देतात का ?
या गोळ्या कोणतीही कॉम्प्लिकेशन न वाढवता परिणाम देतात. period delaying pills घेऊन अपेक्षित निकाल मिळत नाही असे सहजा होत नाही. तसेच त्रास टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्या घ्यायला सुरवात करा.
10. स्त्रिरोगतज्ञांचा सल्ला कधी घ्यावा ?
गोळ्या घेण्याआधी किमान 10 दिवस आधी स्त्रिरोगतज्ञांशी बोला. त्यांंचा सल्ला घ्या. तसेच गोळी घेणं थांबवल्यानंंतर 10-15 दिवसात मासिक पाळी आली नाही तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच या केवळ मासिकपाळी पुढे ढकण्याचा गोळ्या आहेत हे लक्षात ठेवा.
Image Source: Shutterstock
Read this in English
Translated By - Dipali Nevarekar