Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डाएजेस्टीव्ह बिस्किट खरंच आरोग्यदायी पर्याय आहे का ?

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

Image source - Shutterstock

वजनाच्या बाबतीत जागृक असणारे अनेकजण चहासोबत पाव, कूकीज किंवा साधी बिस्किटं खाणं टाळतात. अशा प्रोसेस्ड फूडमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊन वजन वाढू नये म्हणून अनेकजण डायजेस्टीव्ह बिस्किट्सचा आस्वाद घेतात. त्यामधून फायबर मिळते असा तुमचा समज असेल तर पुन्हा एकदा नक्की  विचार करा. डायजेस्टीव्ह बिस्किट्सदेखील प्रोसेस्ड असतात.

आहारतज्ञ स्नेहा साधवानी यांच्या मते, एक आहारतज्ञ म्हणून मी साधी किंवा अगदी डायजेस्टीव्ह बिस्किटं खाण्याचा सल्ला देणार नाही.   साधी बिस्किटं ही त्रासदायक ठरतात. कारण त्यामध्ये प्रोसेस्ड पीठं असतात. त्याचप्रमाणे डाएजेस्टीव बिस्कीटांमध्येही काही त्रासदायक अन्नघटकांचा समावेश असतो. सामान्यतः डाएजेस्टीव्ह बिस्किटांमध्ये 67 कॅलरीज असतात.

  • साखर - नुसतच बिस्किट कोणीच खात नाही. डाएजेस्टीव्ह बिस्किटदेखील सुमारे 3-5 ग्रॅम साखरेचे असते. साध्या बिस्किटांइतके त्यामध्ये साखरेचे प्रमाण आढळत नसले तरीही डाएजेस्टीव्ह बिस्किटही आरोग्यदायी पर्याय नाही. त्याचा आरोग्यावर निश्चितच परिणाम होतो.
  • रिफाईन्ड फ्लोअर - डाएजेस्टीव्ह बिस्किटांमध्ये वापरले जाणारे पीठ रिफाईन्ड नसले तरीही ते सेमी रिफाईन्ड असते. असे स्नेहा सांगतात. गव्हाचे, नाचणीचे पीठ बनवताना त्यामधून कोंडा निघतो. त्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते.
  • फॅट - एका डाएजेस्टीव्ह बिस्किटामध्ये सुमारे 3-5 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट आढळते.
  • प्रिझर्व्हेटीव्ह्ज - स्नेहाच्या मते, प्रिझर्व्हेटीव्ह्जयुक्त पदार्थ खाणं हे त्रासदायकच असते. आठवडाभरापेक्षा अधिककाळ टिकणारे पदार्थ आरोग्याला त्रासदायक ठरतात.

स्नेहाच्या सल्ल्यानुसार, मधल्या भूकेच्या वेळी फळं, सुकामेवा किंवा इतर नैसर्गिक स्वरूपातील पदार्थ खावेत. डाएजेस्टीव्ह बिस्किटांपेक्षा हा पर्याय अधिक फायदेशीर आहे. डाएजेस्टीव्ह बिस्किटांमधून केवळ कॅलरीज, अनहेल्दी फॅट्स मिळतात.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>