नारळीपौर्णिमेचा सण कोळी बांधवांसाठी खास असतो. या दिवशी उधळणार्या समुद्राला नारळ अर्पण करून पुन्हा मासेमारीला सुरवात केली जाते. घराघरात गोडा-धोडाचे पदार्थ केले जातात. मात्र प्रामुख्याने त्यामध्ये खोबर्याचा, नारळाचा समावेश केला जातो. नारळाची बर्फी , नारळाची वडी याप्रमाणेच नारळीभात हा अनेकांच्या आकर्षणाचा खाद्यपदार्थ असतो. आजच्या दिवशी भातावर ताव नक्की मारा कारण भातातून केवळ कॅलरीज नाही, तर हे आरोग्यदायी फायदेदेखील मिळतात. मग पहा कसा नारळीपौर्णिमेला कसा बनवाल नारळीभात
- साहित्य -:
2 वाट्या धुतलेले तांदूळ
4 वाट्या नारळाचे दूध
केशर
जायफळ पूड
सुकामेव्याची पूड
2 चमचे तूप
- कृती – :
तुमच्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार असणारा 2 वाट्या तांदूळ धुऊन निथळत ठेवा.
मोठ्या कढईमध्ये दोन चमचे तूप घालून त्यावर वेलची घाला. यानंतर तांदूळ घालून हलकेच परता. यादरम्यान तांदळाचे दाणे तुटणार नाही याची काळजी घ्या.
त्यानंतर चार कप नारळाचे दूध मिसळून मिश्रण उकळून घ्यावे. नारळाच्या दूधाऐवजी तुम्ही पाण्यामध्येही तांदूळ उकळू शकता. पण नारळाचे दूध का आरोग्यदायी आहे हेदेखील नक्की जाणून घ्या आणि मग ठरवा पाण्याऐवजी नारळाचे दूध का वापराल ?
हे मिश्रण 10 मिनिटे उकळा.
तांदूळ शिजताना त्यामध्ये केशर मिसळा.
तांदूळ पूर्ण शिजल्यानंतरच त्यामध्ये साखर किंवा गूळ मिसळा.
यामध्ये सुकामेवा आणि जायफळ पूड मिसळा.
पुन्हा काही वेळ भात शिजू द्यावा. भातामध्ये साखर / गूळ नीट एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करा.
नारळीपौर्णिमेनंतर येणारा रक्षाबंधनाचा सण तुमच्या बहिणीकरिता अधिक खास करण्यासाठी, तिला यंदा गिफ्ट करा या ’5′ पैकी खास वुमन सेफ्टी गिफ्ट्स !!
Image source – Shutterstock