आजकाल तणावग्रस्त जीवनशैलीमुळे पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. मग त्यावर उपाय म्हणून बाजारात मिळणारी ‘अॅन्टासिड्स’ घेण्याऐवजी ‘कोरफडी’चा रस हा घरगुती उपाय नक्कीच सुरक्षित आणि आरामदायी आहे.
कसे आहे गुणकारी ?
पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी ‘कोरफ़ड’ अत्यंत फायदेशीर आहे. कोरफड रेचक असल्याने बद्धकोष्ठता, पोटातील अल्सर, जळजळ कमी होण्यास मदत होते.
कसे बनवाल हे पेय ?
- कोरफडीचा गर
- ताक
कृती -
- कोरफडीची पात कापून स्वच्छ धुवून घ्यावे.
- पात मधून कापून त्यातील गर काढून घ्यावा. हा गर धुवून त्यावरील पिवळा भाग काढून घ्यावा. असा सल्ला डॉ. शक्ती सुब्रमण्यम यांनी दिला आहे.
- दोन चमचे कोरफडीचा गर ताकात मिसळून अंदाजे 20 मिली मिश्रण बनवावे.
योग्य मात्रा
हे पेय सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अधिक फायदा होतो.
Translated By - Dipali Nevarekar
Source – aloe-vera-home-remedy-for-acidity-and-ulcers
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.