मॅगीमध्ये शरीराला घातक असलेल्या घटकांचे प्रमाण अधिक आढळल्याने काही महिन्यांपूर्वी देशभर गदारोळ माजला होता. परिणामी मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता ही बंदी मुंबई उच्च न्यायालयाने हटवली आहे.
मॅगी नूडल्समध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट म्हणजेच शिसे अतिरिक्त प्रमाणात असल्याचे काही चाचण्यांमध्ये उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने त्यावर बंदीचे आदेश दिले होते. मात्र हे दावे खोटे असल्याचे सांगत नेस्लेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी करताना आज सार्या चाचण्यांमधून बाहेर पडलेल्या मॅगीला बाजारात विक्रीसाठी हिरवा कंदील दाखवत त्यावरील बंदी हटवली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बंदी उठवली असली तरीही देशभरात इतरत्र मॅगीबाबात नेमका काय निर्णय घेतला जाणार याबाबत सार्यांनाच उत्सुकता आहे.
संबंधित दुवे –
’2′ मिनिटांत बनतात हे पाच हेल्दी पदार्थ, मग मॅगी कशाला हवी?
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.