Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कॉम्बिफ्लेम गोळ्या ड्रग्ज टेस्टमध्ये सदोष ! त्याचे सेवन कोणासाठी ठरणार त्रासदायक ?

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

घराघरामध्ये सौम्य अंगदुखी,दातदुखीवर प्रथमोपचार म्हणून ‘कॉम्बिफ्लेम’ गोळ्यांचा साठा ठेवला जातो. पण ‘कॉम्बिफ्लेम’ या पेनकिलरवर केंंद्रिय औषध मानक नियंत्रण संस्थेने मात्र निकृष्ट दर्जा आढळल्याचे कारण देऊन  काही बॅचेस मागे घेण्यास सांगितल्या आहेत. सनोफी या फ्रेंच औषधकंंपनीच्या ‘कॉम्बिफ्लेम’ गोळ्या  भारतीय बाजारपेठांमध्ये गेली अनेक वर्ष उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी जून आणि जूलै 2015 मध्ये तयार करण्यात आलेल्या ज्या मे-जून 2018 अंतिम मुदत असलेल्या गोळ्या मागे घेतल्या जाणार आहेत .

काय दोष आहे ‘कॉम्बिफ्लेम’ गोळ्यांमध्ये ?  

कॉम्बिफ्लेम या गोळ्या पॅरॅसिटॅमोल आणि आयबियोप्रोफिम यापासून बनवल्या जातात. त्यामुळे लहानसहान दुखणी कमी करण्यासाठी त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. या ’5′दुष्परिणामांपासून बचावण्यासाठी पॅरॅसिटॅमोल डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका

एखादी गोळी घेतल्यानंतर शरीरात किती वेळात त्याचे विघटन व्हावे याबाबत काही वैद्यकीय नियम आहेत. मात्र कॉम्बिफ्लेमच्या चार बॅचेस मधील गोळ्या शरीरात विरघळण्यास अधिक वेळ लागत आहे. यामुळे या बॅचेसमधील गोळ्या मागे घेण्यास सनोफी कंपनीने सुरवात केली आहे. A150682 या बॅचमधील आणि अंकलेश्वर युनिटमध्ये निर्माण केलेल्या कॉम्बिफ्लेम गोळ्यांंमध्ये दोष आढळून  आले आहेत.

काय आहे डॉक्टरांचा सल्ला ?

कॉम्बिफ्लेमच्या गोळ्या अंगदुखी कमी करण्यासाठी अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात. त्यामुळे आता कॉम्बिफ्लेमवर निर्बंध आल्याने अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.   डॉ.रतन कुमार वैश यांच्या सल्ल्यानुसार कॉम्बिफ्लेम शरीरात योग्य प्रमाणात विरघळत नसल्याने त्यावर बंदी आली आहे. गोळ्यांचे शरीरात वेळेत विघटन न झाल्यास त्याचा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे रुग्ण अधिक प्रमाणात त्या औषधाचे सेवन करतो. परिणामी औषधांचे मोठे तुकडे किडनीच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात व किडनीचे कार्य बिघडते. प्रामुख्याने डायलिसीसच्या रुग्णांंना हे त्रासदायक ठरू शकते.

अ‍ॅलोपॅथिक औषधांचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांचे सेवन वैदयकीय सल्ल्याने करणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब, मधूमेहाच्या रुग्नांना पेनकिलरच्या गोळ्या अधिक प्रमाणात घेणे त्रासदायक ठरू शकते. डॉ. वैश यांच्या मते, अशा रुग़्नांच्या किडनीवर कॉम्बिफ्लेमसारख्या पेनकिलर अतिप्रमाणात घेणे धोक्याचे ठरू शकते. त्याचप्रमाणे लिव्हर सिरॉसीसच्या रुग्णांमध्येदेखील स्टिरॉईडच्या अतिसेवनाचा परिणाम होतो. यामुळे  त्यांच्यामध्ये गॅस्ट्रिक ब्लिडींगचा त्रास होतो.



Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>