Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दही –युरिनरी ट्रॅक इंफेक्शनवर घरगुती उपाय!

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

युरिनरी ट्रॅक इंफेक्शनचा त्रास अत्यंत त्रासदायक असतो. तसेच त्यावर वेळेवर आणि योग्य उपचार न केल्यास तो पुन्हा पुन्हा उद्भवण्याची शक्यता वाढते. म्हणूनच युरिनरी ट्रॅक इंफेक्शनवर काही घरगुती उपायांनी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.यासाठी भरपूर पाणी पिण्यासोबतच दही आहारात ठेवा. दिवसभरात किमान वाटीभर दह्याचा समावेश केल्यास युरिनरी ट्रॅक इंफेक्शनचा त्रास कमी होण्यास मदत होते. पण रात्रीच्या जेवणात आणि मधूमेहींनी आहारात दह्याचा समावेश करावा का ? हेदेखील जरूर घ्या.

  • दह्याने कसा होईल युरिनरी ट्र्क इंफेक्शनचा त्रास दूर ?

मूत्रमार्गाजवळ बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव वाढल्याने युरिनरी ट्रॅक इंफेक्शनचा त्रास वाढतो. त्यामुळे याभागातील बॅक्टेरियांचा धोका कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे दह्याचा आहारात अधिक समावेश करा. कारण त्यामध्ये अ‍ॅन्टीबायोटीक घटक असतात. दह्यातील लॅक्टोबॅसिल घटक म्हणजेच चांगले बॅक्टेरिया घातक बॅक्टेरियांना मारक ठरतात.त्यामुळे भविष्यातील हा धोकादेखील कमी होतो. इतर अ‍ॅन्टीबायोटीक्स शरीरातील घातक बॅक्टेरियांसोबतच चांगले बॅक्टेरियादेखील कमी करण्यास मदत करतात. मात्र दह्यामुळे पोटातील आवश्यक आणि चांगल्या बॅक्टेरियांचे रक्षण करून केवळ घातक बॅक्टेरियांचा त्रास कमी होतो.

  • दिवसभरात किती प्रमाणात दही खावे ?

अनेक तज्ञ दिवसभरात वाटीभर दही खाण्याचा सल्ला देतात. दह्यामुळे युरिनरी ट्रक इंफेक्शन दूर राहण्यास मदत होते. तसेच काही काळाने तो परत होण्याचा धोका कमी होतो. अमेरिकन सोसायटी फॉर क्लिनिकल न्युट्रीशनच्या अहवलानुसार, दही दिवसभरात तीन वेळा खाल्ल्यास युरिनरी ट्रॅक इंफेक्शनचा त्रास आणि लक्षणं कमी होतात. यासोबतच दिवसभरात 7-8 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे युरिनरी ट्रॅक इंफेक्शनचा त्रासदेखील आपोआप नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

References

  1. Reid G, Bruce AW. Urogenital infections in women: can probiotics help? Postgrad Med J. 2003 Aug;79(934):428-32. Review. PubMed PMID: 12954951; PubMed Central PMCID: PMC1742800.
  2. Kontiokari T, Laitinen J, Järvi L, Pokka T, Sundqvist K, Uhari M. Dietary factors protecting women from urinary tract infection. Am J Clin Nutr. 2003 Mar;77(3):600-4. PubMed PMID: 12600849.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>