छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
सारं झटपट हवं अशा या काळात प्रेम जितकं पटकनं होतं तितकेच पटकन ब्रेकअप्स आणि घटस्फोटदेखील होतात. नात्यामध्ये ताण तणाव निर्माण करण्यामागे अनेक घटक असतात. त्यांना वेळीच ओळखणं गरजेचे असते. लहान सहान गोष्टी हळूहळू मोठ्या होतात आणि नातं तुटण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच रिलेशनशीपमधून बाहेर पडताना स्वतःला त्रास देत राहण्यापेक्षा आधीच थोडी काळजी घ्या. तसेच भविष्यातला मनस्ताप टाळण्यासाठी तुमच्या नात्यांमध्ये तणाव आणणार्या या ’6′ गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या.
- साथीदाराचे फोन, इमेल तपासण्याची इच्छा होणं
कोणतेही नातं विश्वासावर अधिकाधिक काळ टिकून राहते. ज्यावेळी तुमच्या मनात संंशय येतो. किंवा साथीदारावरील विश्वास कमी होतो अशावेळेस साथीदाराचे फोन, सोशल मिडीया अकाऊंट्स तपासून पहावेसे वाटतात. यामधून अधिक गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच ती वेळ येण्याआधीच तुमच्या नात्याबद्दल विचार करा.
2. साथीदाराला त्याच्या गुण-दोषांसकट न स्विकारणे
प्रत्येकामध्ये काही गुण आणि काही दोष असतात. परंतू तुमच्यानुसार समोरच्याने पूर्णपणे बदल्याचा हट्टास करू नका. लहान सहान तडजोड करणे ठीक आहे. परंतू कोणाशी बोलावे?, करियरमधील ‘लक्ष्य’ बदलणे अशा मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तुमच्या सोयीनुसार बदल करायला भाग पाडू नका.
3. नात्यामधील पारदर्शकता कमी होणं
कोणतंच नातं केवळ गुलाबी किंवा आनंदी नसते. त्यामध्ये थोडी भांडणं, नोकझोकदेखील असतात. एकामेकांच्या प्रेमापोटी, काळजीपोटी होणारे सौम्य स्वरूपाचे विवाद स्वाभाविक आहेत. मात्र यामध्ये अहंकाराची भावना आल्यास किंवा समोरच्याचे न ऐकता स्वतःचं सारे निर्णय घेणे नात्याला बिघडवण्यास कारणीभूत ठरतात.
4. नात्यामध्ये मानसिक गरजा पूर्ण न होणंं
नात्यामध्ये दोघांपैकी एकजण सतत प्रभावशाली राहणंं, समोरच्या व्यक्तीची बाजू न ऐकता गैरसमज करून घेणे.यामुळे नाते अधिक कमजोर होते. नात्यामधील एखाद्या व्यक्तीचे वर्चस्व राहणे दुसर्यावर दडपण ठरते. यामधून नातं बहरण्याऐवजी कमजोर होते.
5. एकाच व्यक्तीकडून नातं जपण्याचे प्रयत्न होणे
नातंं निखळ आणि निरपेक्ष असणे गरजेचे असले तरीही त्यासाठी केवळ एकच जण प्रयत्नशील असणे फायाद्याचे नाही. नात्यामध्ये एकाव्यक्तीकडून होणारे प्रयत्न पुरेसे नसतात. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर समोरच्या व्यक्तीकडून प्रतिसाद मिळणेदेखील गरजेचे असते. म्हणूनच भविष्यात निराशा पदरी येण्याऐवजी योग्य वेळी त्याला सांगा की