Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 70रीच्या वयात दलजिंदर कौर यांनी कसा दिला बाळाला जन्म?

$
0
0

हरियाणामध्ये 46 वर्षांच्या संसारानंतर 72 वर्षीय दलजिंंदर कौर या महिलेने बाळाला जन्म दिल्याचे वृत्त झपाट्याने पसरत आहे. वयाच्या उतारार्धात त्यांच्या घरात आलेल्या या नव्या चिमुकल्याच्या आगमनाने कौतुकाचा वर्षाव होत आहे. दलजिंंदर कौर आणि मोहिंदर सिंग गिल या दांपत्यावर नॅशनल फर्टीलिटी अ‍ॅन्ड टेस्ट ट्युब बेबी सेंटर – हिस्सर येथे उपचार करण्यात आले. रिपोर्टनुसार In Vitro Fertilisation (IVF) या तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि दोन वर्षांच्या उपचारानंतर दलजिंंदर कौर यांनी 19 एप्रिल 2016 रोजी बाळाला जन्म दिला. उपचारादरम्यान या दांपत्याच्या शुक्राणूंचा आणि अंड्यांचा वापर केला गेला असल्याचे दावा करण्यात आला आहे.

  • आयवीएफ उपचार पद्धती कशी असते ?

आयवीएफ उपचार पद्धतीत प्रयोगशाळेत विशिष्ट परिस्थितीमध्ये अंड आणि शुक्राणूंचे  मिलन केले जाते. यामधून गर्भाची निर्मिती केली जाते. तयार गर्भाला नऊ महिन्यांसाठी स्त्रीच्या गर्भाशयात ठेवले जाते. त्यानंतर  बाळाचा जन्म होतो.

विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत असले तरीही आयवीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने सत्तरीच्या घरातील महिलेला मूल होऊ शकते याबददल ‘द हेल्थ साईट’च्या मनात काही प्रश्न उभे राहिले आहेत. याबाबत उत्तरं मिळवण्यासाठी हरियाणातील आयवीएफ क्लिनिकच्या डॉ.अनुराग बिष्णोई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

  • आमच्या मनातील हे काही प्रश्न -

दलजिंंदर कौर या सत्तरीच्या वयातील महिला आहे. सामान्यतः स्त्रियांमध्ये 45-50च्या टप्प्यावर आल्यानंतर मोनोपॉजचा काळ सुरू होतो. मग त्यांच्यांमध्ये अंड्यांची निर्मिती कसे होऊ शकते. दलजीत कौर यांच्यामध्ये मोनोपॉजचा काळ सुरू झाला नव्हता का ? वयाच्या या ट्प्प्यावर गर्भाशय कार्यशील नसते मग त्यांच्यामध्ये हे शक्य कसे झाले ? फ्रोझन एग्ज्सच्या माध्यमातून अशाप्रकारे गर्भधारणा होऊ शकते. मात्र दलजींंदर कौरच्या बाबतीत अशाप्रकारचा कोणताच खुलासा किंवा रिपोर्ट पुढे आलेले नाहीत.

मुंबईतील आयवीएफ स्पेशॅलिस्ट डॉ. अनिरुद्ध मालपानी यांच्याची संपर्क साधला असता, त्यांच्यामते, वयाच्या 72 व्या वर्षी स्त्री बाळाला जन्म देऊ शकणे अशक्य आहे. हा दावा खोटा आहे. डॉ. मालपानींच्या मते, 45 वर्षांहून अधिक वयोगटातील मातांमध्ये बाळाला जन्म देण्याचे प्रमाण 1% तर 50शीच्या वरील स्त्रियांमध्ये हे प्रमाण शून्य आहे. स्टेमसेल्स किंवा अंडाशयाला पुनरुज्जीवीत करणे हे देशातील आयवीएफ स्पेशॅलिस्टची प्रतिमा नकारात्मक करते.

डॉ. मालपानींच्या मते, अशा वृत्तांमुळे सरकारचा देशातील आयवीएफ स्पेशॅलिस्टवरील विश्वास कमी होत आहे. तसेच त्यांच्यावरील नियंत्रण वाढवले जाते. सरकार Assisted Reproductive Technology Bill पास करण्याचा विचार करत आहेत. यामुळे 45 हून अधिक वयोगटातील महिलांना आयवीएफच्या मदतीने बाळाला जन्म देणे रोखले जाईल. यामुळे ज्यांच्या मध्ये क्षमता आहे अशा महिलांनादेखील वयाच्या बंधनामुळे आई होण्यापासून दूर ठेवले जाईल.

त्यामुळे तुमच्यासमोर येणार्‍या बातमीकडे सजगपणे पहायला शिका. आयवीएफ किंवा तत्सम कोणत्याही प्रकारचे उपचार निवडताना योग्य आणि तज्ञ डॉक्टरांची मदत घ्या. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका.


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>