जेवणानंतर बडीशेप आणि धनाडाळीचं मिश्रण खाणं पचन सुधारण्यास मदत करते सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधीदेखील कमी करते. धनाडाळ नैसर्गिकरित्या अॅन्टी बॅक्टेरियल, अॅन्टीमायक्रोबायल आणि दाहशामक आहे. त्यामुळे चिमुटभर मीठात भाजलेली धनाडाळ नियमित जेवणानंतर खाणं फायदेशीर ठरते.
- पचन सुधारते -
धनाडाळीमुळे पचनमार्गाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. इंडीयन जर्नल ऑफ फार्मालॉजीच्या अभ्यासानुसार, धनाडाळीमधील काही घटक पचन सुधारण्यास आणि शौचाला साफ होण्यास मदत करतात. पोटामधील पाचक रस आणि एन्झाईम्सना सुधारण्यासाठी तसेच पचन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी धनाडाळ मदत करतात. डायरियाच्या समस्येमध्येही धनाडाळ फायदेशीर आहे.
- तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते – :
धनाडाळ हे एक उत्तम माऊथ फ्रेशनर आहे. जर्नल ऑफ ओरल डिसीसेसच्या अभ्यासानुसार, धनाडाळीमधील Citronellol घटक अॅन्टीसेप्टीक असल्याने तोंडात अल्सर होण्याची समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते. त्याशिवाय धनाडाळीतील दाहशामक आणि अॅन्टीबॅक्टेरियल घटक तोंडात दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. तसेच हिरड्यांचे आरोग्य जपतात.
- रोगप्रतिकारशक्ती सुधारते -
फायटोन्युट्रिएंट्स आणि व्हिटॅमिन यांनी परिपूर्ण धनाडाळ जेवणानंतर खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. असा अहवाल द सायाटीफिक वर्ल्ड जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यामधील अॅन्टीबअॅक्टेरियल आणि अॅन्टीफंगल गुणाधर्म अनेक इंफेक्शनपासून तुमचा बचाव करतात.
- झोप येते -
धनाडाळीमध्ये ताण तणाव कमी करण्याची क्षमता असते. एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, धनाडाळीतील काही तेल शरीरात मानसिक, शारिरीक शांतता निर्माण करण्यास मदत करतात. नसांना शांत करून झोप येण्यास मदत होते.
धनाडाळ किती प्रमाणात खावी?
डॉ. देबांजान भट्टाचार्य यांच्या सल्ल्यानुसार, 1 टीस्पून धनाडाळ जेवणानंतर खाणे पुरेसे आहे.मात्र कोथिंबीर किंआ ध्ण्याचा त्रास, अॅलर्जी असल्यास मात्र धनाडाळ खाणे टाळा.
References
1. Mahendra, P., & Bisht, S. (2011). Activity of Coriandrum sativum assessed using different experimental models. Indian Journal ofPharmacology, 43(5), 574–577.
2. Bradshaw DJ, Perring KD, Cawkill PM, Provan AF, McNulty DA, Saint EJ, Richards J, Munroe MJ, Behan JM. Creation of oral care flavours to deliver breath-freshening benefits. Oral Dis.
3. Hosseinzadeh, H., Alaw Qotbi, A. A., Seidavi, A., Norris, D., & Brown, D. (2014). Effects of Different Levels of Coriander (Coriandrum sativum) Seed Powder and Extract. The Scientific World Journal, 2014.
4. Ashjazadeh N, Boostani R, Ekhtiari H, Emamghoreishi M, Farrokhi M, Ghanizadeh A, Hatam G, Hadianfard H, Lotfi M, Mortazavi SM, Mousavi M, Montakhab A, Nili M, Razmkon A, Salehi S, Sodagar AM, Setoodeh P, Taghipour M, Torabi-Nami M, Vesal A.Operationalizing Cognitive Science and Technologies’ Research and Development;the “Brain and Cognition Study Group (BCSG)” Initiative from Shiraz, Iran. Basic Clin Neurosci. 2014 Spring;5(2):104-16. PubMed PMID: 25337368; PubMed Central PMCID: PMC4202589.