तीन वर्षांपासून मेडीकेअर फाऊंडेशन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये ‘बेटी बचाव’ मोहीमेला एक पाऊल पुढे नेत मुलीचा जन्म झाल्यास तिची फी माफ करण्याची योजना हॉस्पिटलचेअध्यक्ष डॉ गणेश राख यांनी सुरू केली आहे. त्यानंतर आता या हॉस्पिटलकडूनच पाच वर्षांपर्यंतच्या मुलींना ‘फ्री व्हॅक्सिनेशन’ ची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘फ्री व्हॅक्सिनेशन’च्या या उपक्रमांमध्ये पहिल्याच दिवशी 18 हून अधिक मुलींना इंंजेक्शन देण्यात आली आहेत. हडपसर येथील मेडीकेअर फाऊंडेशनच्या मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या मुलींबरोबरच इतरही मुलींसाठी ही ‘फ्री व्हॅक्सिनेशन’ची सोय उपलब्ध असल्याची माहिती डॉ. गणेश राख यांंनी दिली आहे.
नवजात बाळाच्या जन्मानंतर त्यांना पाच वर्षांंपर्यंत सुमारे 12 विविध प्रकारची इंंजेक्शन्स देणे गरजेचे असते. यामुळे भविष्यातील अनेक आजारांपासून त्यांचा बचाव होण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. या उपचाराचा एकूण खर्च 30 हजारांंहून अधिक असतो. ( नक्की वाचा : बाळाचा व्हॅक्सिनेशनचा त्रास कमी करणाऱ्या ‘८’ टीप्स )
मेडीकेअर फाऊंडेशनचे स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनिल चव्हाण यांच्यानुसार, लहान मुलांना दिल्या जाणार्या या इंजेक्शनच्या पॅकेजमधील केवळ न्युमोनियाचे इंजेक्शनची किंमत सोळा हजार असते. त्यामुळे आर्थिक स्थिती हालाखीची असणार्या परिवारातील लोकांना हे उपचार पूर्ण करणे शक्य नसते. परंतू या उपचाराअभावी कोवळ्या वयांंत मुलांमध्ये अनेक आजार बळावण्याची शक्यता असते.
गणेश राख यांनी दिलेल्या WHO या आरोग्यसंस्थेच्या अहवालानुसार, भारत तसेच चीनमध्ये व्हॅक्सिनेशनच्या उपचाराभावी पाचवर्षांपर्यंतच्या लहान मुलींच्या मृत्यूचे प्रमाण हे 75% आहे. प्रामुख्याने यामध्ये फुफ्फुसाच्या विकारांचा समावेश अधिक आहे.
भारतीय पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये मुलाचा जन्म साजरा केला जातो आणि आजही मुलींच्या जन्मानंतर नाराजी व्यक्त केली जाते. त्यांच्या जन्मानंतर नवजात मुलींच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. म्हणूनच मुलींना फ्री व्हॅक्सिनेशनची सोय उपल्ब्ध करून दिली जात असल्याचे डॉ. गणेश राख यांनी सांगितले आहे. तसेच भारतातील इतरही हॉस्पिटल्स आणि लहान मुलांच्या डॉक्टरांनी या उपक्रमाची आणि समस्येची दखल घेऊन फ्री व्हॅक्सिनेशन किंवा जास्तीत जास्त सूट उपलब्ध करून देण्याचे आवाहन डॉ. गणेश राख यांनी केले आहे. यामुळे गरीब घरातील मुलींना आणि परिवारापर्यंत वेळीच योग्य पोहचू शकेल.
मेडीकेअर फाऊंडेशनच्या हॉस्पिटलकडून मुलींच्या जन्माची फी माफ करण्यासोबतच, भारतभरातील अॅसिड हल्ल्यातील जखमी मुलींवरदेखील मोफत उपचार केले जातात.
Source – IANS
छायाचित्र सौजन्य – डॉ. गणेश राख