सेक्स या विषयाबाबत सार्यांनाच फार कुतुहल असते. प्रामुख्याने तरुणांंना ! परंतू अपुरी माहिती आणि खुल्याने चर्चा होत नसल्याने अनेक चूकीचे समज-गैरसमज मनात साठून राहतात. चुकीच्या मार्गाने मुलांपर्यंत पोहचलेली माहिती अनेक गुन्हे आणि समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच जाणून घ्या ‘सेक्स कसा करावा‘ ? म्हणजे पहिल्यांदा सेक्स करताना होणारी फजिती टाळण्यास मदत होईल.
सेक्स हा केवळ लैंगिक सुखापुरता मर्यादीत नसून त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. त्यामुळे ‘त्या’ खास क्षणांचा आनंद घेण्याआधी स्त्री शरीराबाबत काही सेक्सी फॅक्ट्स आणि योनीमार्गाबाबत या काही गोष्टी नक्की जाणून घ्या.
- योनीमार्ग कोणीच पाहू शकत नाही -:
अनेकजण स्त्रीशरीरातील जननेंद्रियाच्या बाहेरील भागाला ‘योनिमार्ग’ संबोधतात. परंतू हे केवळ योनिमार्गाचे मुख आहे. योनिमार्ग हा नळीसारखा लांब असतो. 3-4 इंच उंचीचा आणि 2-4 इंच लांब असतो. योनिमार्गाचे एक टोक गर्भाशयाला जोडलेले असते. आपण पाहतो त्या भागाला वुल्वा (vulva) म्हणतात.
- योनिमार्ग मांसल आणि संवेदनशील असतो -:
योनि आणि योनिमार्ग हे मांसल असते. त्यामुळे ते लवचिक बनण्यास मदत होते. यामुळेच पेनिट्रेशन करताना आणि बाळाला जन्म देताना अधिक उघडते. अशा वेळी योनिमार्ग 10-20 सेमी लांब आणि 2.5 इंच उंच उघडण्याची क्षमता योनिमार्गामध्ये असते.
- प्रत्येक स्त्रीला हायमेन नसते -:
स्त्रीच्या पावित्र्याशी संबंध लावला जाणारा हायमेन हा एक पातळ पडदा असतो. काही जणींमध्ये हा पडदा नसतो. काहींचा पडदा व्यायाम, सायकलिंग किंवा अतिकष्टाच्या व्यायाम प्रकारामुळे सेक्सपूर्वीच फाटला जातो. योनिमार्गाच्या 1-2 सेमी आतमध्ये योनिमार्ग असतो. पहिल्यांदा सेक्स करताना हा पडदा फाटल्याने रक्तप्रवाह होऊ शकतो. पण रक्तप्रवाह न झाल्यास त्याचा थेट संबंध स्त्रीच्या पावित्र्याशी लावू नये.
- जी स्पॉटचे अस्तित्त्व असते -:
जी – स्पॉट हा केवळ गैरसमज नाही. या भागाला चालना दिल्याने स्त्रिया उत्तेजित होतात. योनिमार्गाच्या समोरील भागावर जी स्पॉट असतो. या भागावर अनेक नसांचे टोक जुळलेले असते. त्यामुळे या एका भागाला चालना दिल्यास स्त्रिया अधिक उत्तेजित होतात.
- शिश्नाच्या उंचीवर आनंद अवलंबून नसतो -:
शिश्नाच्या उंचीवर स्त्रियांचा आनंद मूळीच अवलंबून नसतो. योनीमार्गात असणारे नसांचे जाळे आणि त्यांना दिलेली चालना यावर सेक्स दरम्यानचा आनंद आणि वेदना अवलंबून असतात.
- स्त्रियांमध्ये नैसर्गिक ल्युब्रिकंट क्षमता असते -:
अनेक स्त्रियांना योनिमार्गात शुष्कता जाणवते. परंतू स्त्रियांंना पुरेसे उत्तेजित केल्यास नैसर्गिकरित्या त्या जागी ओलसरपणा निर्माण होतो आणि सेक्सचा आनंद अधिकाधिक घेणं शक्य होते. इंटरकोर्सच्या दरम्यानही हा स्त्राव वाहत असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला विशेष ल्युब्रिकंटची गरज नसते. मात्र चालना देऊनही सेक्सदरम्यान त्रास जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.