Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बडीशेपाचे सरबत –उन्हाळ्यातील रिफ्रेशिंग घरगुती पेय

$
0
0

Read this in English 

 Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –Shutterstock

जेवणानंतर बडीशेप आणि धनाडाळ खाण्याची सवय अनेकांना असते. बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारते. तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते. तसेच पोटात क्रॅम्स आणि गॅसचा वाढलेला त्रासही आटोक्यात राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात बडीशेप नुसती खाण्यासोबतच त्याचे सरबत बनवून ठेवणेदेखील फायद्याचे ठरते. उन्हाच्या झळा आणि तीव्र उष्णतेमुळे डीहायड्रेशनचा त्रास होतो. यापासून बचावण्यासाठी बाजारातील विकतची सरबतं पिण्यापेक्षा घरगुती बडीशेपाचे सरबत नक्की पिऊन पहा. यामुळे उकाड्यापासून तुमचा नैसर्गिकरित्या बचाव होण्यास मदत होते. बडीशेपाचे सरबत प्रामुख्याने प्यायले जाते. नक्की वाचा - डीहायड्रेशनचा त्रास कमी करेल घरगुती ‘ऑरेंज कूलर’

  • बडीशेपाचे पाणी – उत्तम कुलंट : 

नयाती हॉस्पिटल्सचे डाएटीशन डॉ. आस्था शर्मा यांच्या सल्ल्यानुसार, बडीशेपामुळे शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत होते. हे एक आवश्यक पोषणघटक आणि सोबतच अ‍ॅन्टीऑक्सिडंटदेखील आहे. बडीशेप उन्हाळ्याच्या दिवसांत उत्तम कूलंट म्हणूनदेखील काम करते. उष्णतेमुळे होणारी अंगाची लाही कमी करण्यास फायादेशीर ठरते. परिणामी  मन आणि शरीर दोन्ही शांत राहते. आयुर्वेदानुसार, शरीरात कफ, पित्त आणि वात हे त्रिदोष असतात. बडीशेप या त्रिदोषांमध्ये संतुलन राखण्यास मदत करते.  बडीशेपामधील तेल नसांंना शांत करते. तसेच तोंडाचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.  म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात आहारात नक्की बडीशेपाचा समावेश करावा.

बडीशेप शरीरात थंडावा निर्माण करत असल्याने पोटातील जळजळ कमी होते. तसेच पोटातील पाचक रसाला चालना मिळाल्याने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. म्हणूनच जेवणापूर्वी आणि जेवणानंतरही चिमुटभर बडीशेप चघळा.

  • कसे बनवाल बडीशेपाचे सरबत ? 

बडीशेपाचे पाणी किंवा सरबत बनवणे  हे अगदी सोपे आहे.  बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळा. रात्रभर बडीशेपाचे दाणे पाण्यातच राहू द्या. दुसर्‍यादिवशी सकाळी पाणी गाळून बाटलीत भरून ठेवा. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी प्या.

लहान मुलांसाठी बडीशेपाचे दाणे उकळल्यानंतर त्यामध्ये साखर किंवा मध मिसळून पाणी थंड होऊ द्या. तयार सरबत मुलांसाठी अत्यंत चविष्ट आरोग्यदायी ठरेल.बडीशेपाचे पाणी थोडे थंड करून प्यायल्यास ते अधिक चविष्ट लागते. बडीशेपाचे पाणी थोडे अधिक चविष्ट आणि सुवासिक करण्यासाठी दाणे भाजून नंतर पाण्यात उकळा. यामुळे पाण्याला उत्तम आणि नैसर्गिक सुगंध  येईल. गोडसर चवीसाठी बडीशेप खायच्या पानामध्ये भाजा.  यासोबतच तुम्ही उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी रिफ्रेशिंग पेयांचा नक्की आस्वाद घेऊ शकता.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>