छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
वाढ्त्या वयानुसार हाडं ढिसूळ होणं संंधीवाताचा, गुडघेदुखीचा त्रास जडणंं होतेच. परंतू आजकाम व्यायामाचा अभाव आणि बराच वेळ बसून काम करण्याची सवय यामुळे तरुणांमध्येदेखील आजकाल गुडघेदुखीचा, सांध्यांच्या दुखण्याचा त्रास वाढला आहे. मग कामाच्या धावपळीदरम्यान अशा दुखण्यापासून झटपट आराम मिळवण्यासाठी काही उपाय केले जातात. अनेकजण काही जेल, क्रीम्स किंवा रोल ऑन ऑईनमेंंटचा पर्याय निवडून तात्काळ आराम मिळवण्याचा उपाय निवडतात. पण यामुळे हा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढते.
तेल किंवा ऑईनमेंट्स सांधेदुखीपासून आराम का देत नाही ?
सांध्याचे दुखणे कमी करण्यासाठी अनेकजण सतत ऑईनमेंंटसचा वापर करतात. परंतू त्यामुळे दुखण्यापासून आराम मिळत नसल्याची तक्रार अनेकांना असते. यामागील कारण ऑर्थोपेडीक सर्जन (specialising in knee, foot and ankle surgery) डॉ. प्रदीप मुनोत यांनी सांगितले आहे. त्यांच्यामते, मसाज हा त्वचेशी निगडीत असतो. सांध्यांपर्यंत फारसा पोहचत नाही. त्यामुळे सांध्यांच्या दुखण्यावर परिणाम होत नाही.
मात्र याचा अर्थ असा नाही की मसाज मूळीच फायदेशीर नसतो. काही दुखण्यांंमध्ये तज्ञ वैद्यांनी केलेला मसाज तात्काळ आराम देण्यास फायदेशीर ठरतो. म्हणूनच गेली कित्येक वर्ष थाई मसाज अनेकांना फायदेशीर ठरत आहे. तेल किंवा ऑईनमेंंटसोबत केलेला मसाज त्वचेमध्ये खोलवर जातो.पण सांध्यांंना पूर्ववत करण्यास फारसा सफल होत नाही. अर्थ्राईटीसच्या त्रासामध्ये सुरवातीच्या टप्प्यांत गुडघेदुखीचा किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवतो. मात्र यामागे सांध्यातील वंगण कमी होणे, सांध्याची झीज होणे अशी कारणंंदेखील असू शकतात.
‘तेलाचा मसाज केल्याने सांध्याची झीज भरून निघत नाही किंवा कमी झालेले वंगण वाढण्यास मदत होत नाही. त्यामुळे सांध्यांचे दुखणेही कमी होत नाही.’ या उलट अनेकदा तेलाचा मसाज वेदना वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामूळे घरगुती उपायांचा वापर करत बसण्याऐवजी वेळीच डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा सल्ला डॉ. मुनोत देतात.