Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डीहायड्रेशनचा त्रास कमी करेल घरगुती ‘ऑरेंज कूलर’

$
0
0

Read this in English 

 Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –Shutterstock

उन्हाळ्याच्या दिवसात हायड्रेटेड राहण्यासाठी केवळ पाणी पिणे पुरेसे नसते. शरीरात उर्जा आणि इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाणही योग्य राखणे गरजेचे असते. सतत वाहणार्‍या घामातून शरीरातील आवश्यक पोषण घटकांचा नाश होतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात मुबलक उपलब्ध असणार्‍या संत्र्यांचा आहारात समावेश करावा. संत्र्यामधून शरीराला व्हिटामिन सी आणि फायबर्सचा पुरवठा होतो. यामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच डायरीयाच्या समस्येवरही संत्र खाणे फायद्याचे ठरते. फळ  किंवा त्याचा रसदेखील पिणे उत्तम समर ड्रिंक आहे.

कसे बनवाल ऑरेज समर ड्रिंक ? 

  • ¼ कप ताजा संत्र्याचा रस (60 ml)
  • 2 कप साधे पाणी
  • ½ टीस्पून बेकींग सोडा
  • दोन टीस्पून मध

मिक्सरच्या भांड्यामध्ये ताजा संत्र्याचा रस, पाणी, आणि बेकिंग सोडा एकत्र करा. हे सारे मिश्रण एकत्र फिरवा. बेकींग सोडा नीट मिसळल्यानंतर त्यामध्ये मध मिसळा. हे मिश्रण नीट एकजीव केल्यानंतर दोन ग्लासांमध्ये ओतून थोडा वेळ थंड करा किंवा बर्फाचे तुकडे मिसळून प्या.

कसे ठरते हे ड्रिंक फायदेशीर ?

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक, फायबर्सचे प्रमाण मुबलक असते. यामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच पोटाचे आरोग्य सुधारते. या ड्रिंकमुळे पाण्याचे प्रमाण नियमित राखण्यास मदत होते. तसेच घामाद्वारे बाहेर पडणार्‍या  इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण सुधारण्यास मदत होते. यामधून सोडियम, पोटॅशियम, साखर या उर्जावर्धक घटकांचा शरीराला पुरवठा होतो. तर बेकिंग सोडा शरीरातील अल्कलाइन घटक सुधारण्यास मदत होते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहते. परिणामी डीहायाड्रेशनचा त्रास कमी होतो.

Reference

White, Linda B., Barbara H. Seeber, and Barbara Brownell Grogan. 500 Time-tested Home Remedies and the Science Behind Them: Ease Aches, Pains, Ailments, and More with Hundreds of Simple and Effective At-home Treatments. Fair Winds Press, 2013.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>