Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
Image source: Shutterstock
काहींसाठी सेक्स हे केवळ शरीरसुख आहे. त्यातून मिळणार्या ऑर्गॅझमच्या आनंदापुरते ते मर्यादीत असते.
सेक्समधील या आनंदापेक्षाही त्याचे आरोग्यदायी फायदे देखील अधिक आहेत. सेक्समुळे दोघांमधील भावनिक बंध अधिक सुधारतात. अर्थातच तो दोघांच्याही संमंतीने केलेला असेल तर ! पण अनेकांना सेक्स नेमका कसा करावा याबद्दल पुरेशी माहिती नसल्यान फेक ऑर्गॅझममुळे अनेकदा निराशा होतो. म्हणूनच सेक्सदरम्यान आपल्या शरीरात नेमके काय होते यासोबतच सेक्सचा खरा आनंद कसा घ्यावा हेदेखील नक्की जाणून घ्या.
- एकमेकांच्या जवळ या
अनेकांना आणि प्रामुख्याने तरुणंना सेक्स म्हणजे केवळ पेनिट्रेशन वाटते. ज्यामध्ये स्त्रीच्या योनीमार्गात शिश्न म्हणजे पेनिज घालणे इतकाच सेक्सचा आनंद मर्यादीत नसतो. त्याआधी नेमके योनिमार्ग कुठे आहे हेदेखील समजले पाहिजे.
योनिमार्ग ही एक नळी असून त्याचे टोक गर्भाशयाला जोडलेले असते. ज्या ठिकाणी शिश्न आत घातले जाते तो योनिमार्ग नसून केवळ योनिमार्गाचे मुख असते. जनजेंद्रिय थोडे उघडले तर योनिमार्गाचे मुख सहज सापडते. त्यामुळे सावकाश या क्षणांचा आनंद घ्या. घाईत शिश्न घासू नका. ही चूक अनेकदा पहिल्यांदा सेक्स करताना होऊ शकते. (सेक्स गाईड – कसा घ्यावा महिलांनी पहिल्यांदा सेक्स करताना आनंद)
पहिल्यांदा सेक्स करताना अनेकांना हायमेन म्हणजेच स्त्रीच्या योनीमार्गातील पडदा फाटण्याची आणि रक्तप्रवाह होण्याची भीती वाटते. हा पडदा सेक्सशिवायही इतर मार्गाने फाटू शकतो. व्यायाम, सायकलिंग अशा फिजिकल अॅक्टिव्हिटीमुळेदेखील पडदा फाटल्याने पहिल्यांदा रक्तस्त्राव होत नाही. त्यामुळे याचा थेट स्त्रीच्या पावित्र्याशी संबंध जोडू नका. पहिल्यांदा ‘सेक्स’करताना पुरूषांनी ठेवावे या ’8′ गोष्टींचे भान !
- कामक्रिडेचादेखील आनंद घ्या
सेक्सचा आनंद झटपट घेण्यात नसतो. तो हळू हळू खुलवावा लागतो. त्यासाठी स्त्रीच्या नाजूक भागांना हात लावा. त्यांना चालना द्या. कामक्रिडेचा आनंद स्त्री आणि पुरुषांनी दोघांनाही घेणे गरजेचे आहे. मग कामक्रिडा वाढवा या ‘5’ विचित्र मात्र रोचक पर्यायांनी !
कामक्रिडेमुळे तुम्ही उत्तेजित होतात हे बरोबर असले तरीही स्त्रीयांना विशिष्ट भागांना चालना दिल्यास त्या अधिक उत्तेजित होतात. कानामागे किस करणे, मानेच्या मागे हात लावणे किंवा केसांत हळूच बोटं फिरवणं यामुळे त्या उत्तेजित होतात. निपल्सदेखील दोघांनाही उत्तेजित करण्यास मदत करतात. स्त्री शरीरात जी स्पॉटला चालना दिल्यासही त्या उत्तेजित होतात. कारण या भागात अनेक नसांचे टोक असते.पण ती नेमकी जागा मिळणे गरजेचे असते. यासोबतच योनिलिंगदेखील संवेद्नशील असते. हे सरेच अवयव नाजूक असल्याने अति घाई किंवा जोर लावू नये. नक्की वाचा स्त्री शरीराबाबतचे ’8′ सेक्सी फॅक्ट्स !
दोघेही पुरेसे उत्तेजित झाल्यानंतर त्यांना जाणीव होते. पुरूषांचे शिश्न ताठ होते तर स्त्रियांना त्या जागी ओल्सरपणा जाणवतो. स्त्रियांना नैसर्गिक ल्युबरिकंट असते. त्यांच्या शरीरातील विशिष्ट भागात ओलावा तयार होतो. फक्त त्यांना पुरेशी चालना मिळणे गरजेचे असते.
- सेक्सचा आनंद
तुम्ही पहिल्यांदा सेक्स करत असल्यास बेसिक मिशनरी पोजिशनचा आनंद घ्या. काही काळाने तुम्ही विविध पोजिशनचा आनंद घेऊ शकता. अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर नक्की करा.
स्त्रियांना पाठीवर झोपू द्या. त्यांच्या शरीरावर झोपून तुम्ही शिश्न योनिमार्गात घाला. गरज वाटल्यास तिची मदत घ्या आणि एकमेकांच्या अगदी जवळ रहा. या क्षणांचा आनंद दोघांनाही घेणं गरजेचे आहे. एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करा. त्यांना मिठीत घ्या किस करा. नक्की वाचा एकत्र ऑर्गेझम मिळवण्याच्या 5 खास टीप्स !
सेक्सच्या आनंदानंतरही काही काळ एकमेकांसोबत घालवा. एकमेकांना कम्फर्टटेबल करा. सेक्सनंतरचा काही काळ देखिल महत्त्वाचा असतो. त्यावेळी लगेच उठून जाऊ नका. तसेच या काही चूका नक्की टाळा.