Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

योगसाधनेची किमया ! इन्सुलिनपासून मिळवली या मधूमेहीने कायमची सुटका

$
0
0

Read this in English 

 Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Surendra Rajput

सुरेंद्रसिंग राजपूत या 61 वर्षीय मधूमेही रुग्णाच्या दिवसाची सुरवात काही दिवसांपूर्वीपर्यंत  25 डोस इन्सुलिनने व्हायची. 20 वर्षांपूर्वी त्यांना मधूमेहाचे निदान झाले.सामान्य माणसाची जेवणापूर्वी रक्तातील साखर ७० ते ११० mg/dL आणि जेवणानंतर १०० ते १४० असणे सामान्य असते. परंतू राजपूत यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 560 mg/dL इतके असायचे.

मधूमेहाचा त्रास राजपूत यांना दिवसेंदिवस त्रासदायक ठरत होता. त्याचे स्वास्थ्य खालावत होता. ‘औषध आणि इन्सुलिनच्या वापरानेदेखील रक्तातील साखरेचे प्रमाण 400 mg/dL इतकेच खाली येत होते.’असे राजपूत सांगतात. ’2011 मला मित्राने औषधोपचारांसोबत योगवर्गाची मदत घेण्याचा सल्ला दिला आणित्य नुसार कामातून 17 दिवसांची रजा घेऊन मी बॅंगलोर येथील Swami Vivekananda Yoga AnusandhanaSamsthana ( VYASA) येथे योगावर्गाला सुरवात केली’. असे सुरेंद्रसिंग राजपूत सांगतात.

  • कसा होता योग वर्गातील दिनक्रम ?

व्यास योगाकेंद्रामध्ये आयुर्वेदीक उपचार पद्धतींचा वापर करून अनेक लाईफ स्टाईल समस्यांवर मात करता येते. यानुसार राजपूत यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण चार दिवसांच्या अभ्यासानंतर 140 mg/dL इतके कमी झाले. ( नक्की वाचा : मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय)

राजपूत यांच्या सांगण्यानुसार, ‘ नियमित सकाळी 5.30 ला उठून 7.30 पर्यंत सारे जण प्रार्थनेसाठी एकत्र जमत. त्यानंतर हलका नाश्त्या करून वैद्यकीय चाचणी केली जात असे त्यानंतर योगासनांचा सराव होत असे. दुपारी 1 वाजेपर्यंत आहारात कोणते बदल केले पाहिजे हे देखील सुचवले जात असे.

दुपारच्या जेवणानंतरदेखील काही रिलॅक्सेशन थेरपी, व्यायाम, योगा यांचा सराव केला जात असे.’योगसाधनेसोबतच काही मसाज, मड थेरपी आणि नॅचरोपॅथी यांचादेखील दिनक्रमात समावेश केलेला असे.

2011 साली घेतलेल्या या योगासाधनेच्या प्रशिक्षणानंतर राजपूत यांच्या प्रकृतीमध्ये बरीच सुधारणा आढळून आली आहे. ‘पूर्वीपेक्षा मला फारच आरोग्यदायी वाटते. इन्सुलिन बंद करून आता केवळ 2 ओरल टॅबलेट्स (औषध गोळ्या) घ्यावा लागतात’ असे राजपूत सांगतात.

शरीरातील पाच आवरणं म्हणजेच पंचकोशांचे कार्य नियमित करणारी योगविद्या आणि इतर पद्धती फारच फायदेशीर ठरतात. ‘पहिल्या चार दिवसातच दिसून आलेला बदल यामुळे इन्सुलिन घेण्याचा त्रास संपला. 2011 नंतर पुन्हा जानेवारी महिन्यात मी व्यास योगाकेंद्रावर एक योगशिबीर केले. त्यानंतरही मला दोन ऐवजी एकच गोळी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आता माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आहे.’ असे राजपूत सांगतात. मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !

  • मधूमेहींनी कोणती योगासनं करावीत?

सुरेंद्रसिंग राजपूत यांच्यावर उपचार करणारे व्यास योगाकेंद्राचे डॉक्टर अमित सिंग (चीफ मेडीकल ऑफिसर – आरोग्यधर्म) यांच्यामते, खालील योगासनांमुळे रक्तातील वाढलेली साखर अणि मधूमेहाचा धूका कमी करण्यास मदत होते.

अर्धचक्रासन, धनुरासन, त्रिकोणासन, अर्धमत्येंद्रासन, शशांकासन, भूजंगासन, मकरासन, पवनमुक्तासन  आणि सेतुबंधासन हे मधूमेहींसाठी फायदेशीर ठरते. मात्र सलंबासन मधूमेहाच्या रुग्णंनी करू नये.घरगुती उपायांबरोबरच तुम्ही योगासने करूनही मधुमेहावर नियंत्रण करू शकता.



Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>