बर्याचदा बाहेरचे खाणे, कामाचा थकवा, सतत चहा कॉफी पिणे तसेच खूप वेळ उपाशी राहणे अशा आरोग्याची हेळसांड करणार्या तुमाच्या सवयी पचनाचे विकार, बद्धकोष्ठता, पित्त, गॅस अशा समस्यांना आमंत्रण देते. याचसोबत कमकुवत पचनशक्तीमुळे पोटाजवळ अतिरिक्त चरबी (फॅट ) वाढण्याची शक्यता असते. पण आता यासार्यातून बाहेर पडण्यासाठी अॅन्टासाईड्स किंवा तत्सम औषधं घेण्याची काहीच गरज नाही. कारण खायचं पान, ओवा आणि लवंग़ाच्या मिश्रणाने या समस्येपासून तुमची झटक्यात सुटका होणार आहे.
- का आहे हे फायदेशीर ?
ओवा, लवंग आणि खायचं पान एकत्र करून खाल्ल्यास पचन सुधारते, मेटॅबॉलिक रेट सुधारतो, पित्त आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. हे मिश्रण रेचक असल्याने पचनाची समस्या कमी होते. तसेच या मिश्रणामुळे लाळ निर्मीतीच्या कार्याला चालना मिळते. परिणामी आतड्यांचे कार्य सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
- कसे कराल हे मिश्रण ?
एका खायच्या पानामध्ये एक लवंग, अर्धा चमचा ओवा मिसळा. आता हे पान गुंडाळून त्याची पुरचुंडी बांधा. तोंडात हे पान मागच्या बाजूला ठेवा आणि हळूहळू चावा. परंतू चघळू नका. या पानाचा रस हळूहळू गिळा. हे सारे पान संपवा.
- किती वेळा हे मिश्रण खावे ?
हे पान दिवसातून एकदा खाणे पुरेसे आहे.
खबरदारीचा उपाय :
ओवा आणि खायचं पान हे दोन्ही जरा तिखट असल्याने चघळू नका. खाताना जर खूपच जळजळत असेल तर थोडेसे पाणी प्यावे.
संबंधित दुवे -
- जिममध्ये न जाता, या मुलीने ‘८’ महिन्यांत घटवले 23 किलो वजन !
- वजन घटवा ’8′ मजेशीर व्यायामप्रकारा संगे !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Sourece - lose-weight-and-beat-bloating-with-this-betel-leaf-ajwain-mix
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.