घरात एखादा लग्न-समारंभ किंवा तुम्ही एखाद्या पार्टीसाठी एक्साईट असतानाच अचानक येणारा ‘पिंपल’ तुमच्या सार्या आनंदावर पाणी फिरवून जातो. अशावेळी नकळत तो फोडण्याचा मोह अनेकांना होतो. पण यामुळे चेहर्यावर डाग पडण्याचे तसेच त्वचेखाली इन्फेक्शन वाढण्याचा धोका अधिक असतो. मग झटपट पिंपल हटवण्यासाठी काही महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स किंवा क्रिम्स लावण्याऐवजी ‘चंदन आणि गुलाबपाणी’ हा घरगुती उपाय नक्कीच तुम्हांला फायदेशीर ठरेल.
चंदन – गुलाबपाणी : जादूई उपाय
- चंदन पावडरमध्ये थोडेसे गुलाबपाणी मिसळून त्याची पेस्ट बनवा.
- जर तुमच्याकडे चंदनाची काडी असेल तर ती सहाणेवर उगळा. व त्याला भिजवताना काही थेंब गुलाबपाण्याचे टाका.
- ही पेस्ट पिंपलवर लावा.
- रात्रभर सुकू द्या व सकाळी उठून चेहरा स्वच्छ धुवा.
या प्रयोगानंतर तुम्हांला नक्कीच मुरूमांपासून झटपट आराम मिळेल. याचसोबत तुम्हांला वारंवार मोठ्या प्रमाणात येणार्या पिंपल्सची समस्या कमी करण्यासाठी
या घरगुती पॅक्सने त्यांचा समुळ नाश करा.
रात्रीच्या वेळेस तुमचं सौंदर्य खुलवणारी खास रहस्य जाणून घ्यायचीत ? मग खालील फोटोवर क्लिक करा……
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Sourece - with-sandalwood-and-rose-water-home-remedy-to-get-rid-of-pimples-overnight
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.