पदार्थांची चव वाढवायला, काही आजारांमध्ये प्राथमिक उपचार म्हणून ‘कांद्या’चा वापर केला जातो. हे तुम्हांला ठाऊक असेलच पण आजकाल आबालवृद्धांना भेडसावणारी केसगळतीची समस्या रोखण्यासाठीही ‘कांदा’ हा अतिशय उपयुक्त घरगुती उपाय आहे. (येथे पहा कांद्याचे ५ आरोग्यदायी फायदे)
त्वचारोगतज्ञांच्या मते, दिवसाला 50-100 केस गळणे हे अगदी सामान्य आहे. परंतू केसगळतीचे प्रमाण याहून अधिक असेल तर मात्र चिंतेची बाब आहे. केसगळतीचे प्रमाण वाढले तर ते विरळ होतात, काही ठिकाणी टक्कल पडते. तिशीतील अनेक तरुण-तरूणींमध्ये आढळणारी ही समस्या हार्मोनल बदल, ताण-तणाव आणि आहारातून पुरेसे पोषण न मिळणे यामुळे तयार होते.
दिवसेंदिवस वाढणारी ही समस्या ‘कांद्या’मुळे आटोक्यात येऊ शकते. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असल्याने केसांच्या वाढीसाठी मदत होते. तसेच केस तुटणे, केसांची खुंटलेली वाढ पुनरुज्जिवीत होणे. कांद्यामुळे कोलेजनच्या निर्मीतीस चालना मिळते परिणामी केसांची वाढही सुधारते.
कसा रोखेल कांदा ‘केसगळती’ची समस्या ?
- कांदा केसांना पुरेसे पोषण देते. केसांची मूळ मजबूत करते.
- कच्चट कांदा टाळूवर घासल्याने रक्तप्रवाह सुधारतो. तसेच केसांच्या मूळांना बळकट करतो.
- कांद्यामधील सल्फर घटक केस विरळ होण्याची आणि तूटण्याची समस्या आटोक्यात ठेवतात.
- कांदा हा अॅन्टीबॅक्टीरियल असल्याने टाळूवरील संसर्ग टाळण्यास मदत होते.
- अकाली केस पांढरे होणे ही समस्या कॅटॅलाइस (प्रोटीनयुक्त एंझाईम्सचा प्रकार) आणि अॅन्टीऑक्सिडंट्सच्या कमतरतेमुळे तयार होतात. कांदा कॅटॅलाईसच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत करतो.
कांद्याचे हेअर पॅक्स -
- कांद्याचा रस
कांदा चिरून मिक्सरमधून वाटून त्याची पातळ पेस्ट करा. ही पेस्ट 15 मिनिटे केसांना लावून ठेवा. सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.
- कांद्याचा रस आणि मध
मधामध्ये केसांचे पोषण आणि मॉईश्चर करण्याची क्षमता असल्याने केसांसाठीदेखील ते उपयुक्त आहे. 1/4 कप कांद्याचा रस आणि मध हे मिश्रण प्यायल्यास अथवा टाळूला लावल्यास तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकते. पण मधात भेसळ नाही हे तपासण्यासाठी करा या घरगुती चाचण्या.
कांद्याव्यतिरिक्त अन्य घरगुती उपायांनी केसगळतीची समस्या रोखणारे अन्य घरगुती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
संबंधित दुवे
- ‘त्रिफळा’- केसांच्या समस्या दूर करणारा घरगुती उपाय
- ‘हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय
- केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !
Translated By - Dipali Nevarekar
Source - onion-effective-home-remedy-to-beat-hair-loss
छायाचित्र सौजन्य – Getty Images
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.