छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
उन्हाचा कडाका दिवसेंंदिवस वाढत आहे. मात्र कामानिमित्त बाहेर पडणे, फिरणे यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात हीटस्ट्रोक ( उष्माघात) किंवा डीहायड्रेशनचा त्रास वाढू शकतो. याकडे पुरेसे लक्ष न दिल्यास उन्हाचा त्रास जीवघेणा ठरू शकतो. घामातून सोडियम, पोटॅशियम यासारख्या इलेक्ट्रोलाईट्सचा र्हास होतो. शरीरातील या आवश्यक पोषणद्रव्यांचा नाश झाल्यास उष्माघाताचा त्रास वाढतो. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हायड्रेटेड राहने आवश्यक आहे. उन्हाळ्याचे दिवस सुट्टीचे असल्याने तुम्ही बाहेर फिरायला जात असल्यास आवश्यक काळजी नक्की घ्या. तसेच हीटस्ट्रोकचा त्रास जाणवल्यास ताबडतोब करा हे प्रथमोपचार !
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना कोणती काळजी घ्याल ?
- बाहेर फिरताना उष्माघाताचा त्रास जाणवत असल्यास सावलीच्या ठिकाणी बसा. उन्हातून थेट वातानुकुलित जागी जाऊ नका. शरीराचे तापमान हळूहळू कमी होऊ द्या.
- उन्हापेक्षा घरातील सामान्य वातावरणात तुमच्या शरीराचे तापमान जुळू द्या.
- उन्हांत फिरताना डोकं आणि चेहरा स्कार्फने झाकून घ्या. तसेच सुती कपडे वापरा. यामुळे उष्णणतेचा त्रास कमी होईल. उन्हाळ्यात या ’7′ कापडांचा वापर टाळाच !
- उन्हांत फिरताना छत्री, सनग्लासेस वापरा. यामुळे डोळे आणि चेहर्याचे रक्षण होईल.
- उन्हातून फिरून आल्यानंतर ताबडतोब आंघोळ करू नका.
- उष्मामाघाताचा त्रास कमी करण्यासाठी पाण्याव्यतिरिक्तही इतर पेयांनी शरीर हायाड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. आवडीनुसार शीतपेयांंचा,समर कुलर्सचा साठा जवळ ठेवा.
पाण्याव्यतिरिक्तदेखील अन्य कोणकोणत्या मार्गाने उन्हाळ्यात हायाड्रेटेड राहता येऊ शकते हे तुम्हांला ठाऊक आहे का ? आहारात ताज्या फळांचा, पाणीदार भाज्यांचा समावेश कराच. तसेच या खालील समर स्पेशल ड्रिंक्सचा घरच्या घरी बनवून आस्वाद नक्की घ्या. तसेच उन्हाळ्यांच्या दिवसात बाहेर फिरताना तुमच्या जवळ ही पेय ठेवल्यास शरीरातील उर्जा टिकून राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात हे ५ पदार्थ अधिकप्रमाणात खाउ नयेत.
रिफ्रेशिंंग घरगुती हेल्थ ड्रिंक्स – :
- लिंबू पाणी: उन्हाचा त्रास दूर करणारा हा स्वस्तात मस्त पर्याय आहे. लहान मुलंदेखील हमखास हे पेय घरी बनवू शकतात. ग्लासभर पाण्यात लिंबाचा रस पिळून त्यामध्ये साखर मीठ मिसळून नक्की प्या रिफ्रेशिंग लिंबूपाणी.
- शहाळ्याचे पाणी : हेल्दी आणि गारेगार शहाळ्याचे पाणी आणि मलई शरीरात उर्जा निर्माण करण्यास मदत करते.
- शिकंजी : हे एक उत्तम रिफ्रेशिंग पेय आहे. यामधून व्हिटॅमिन सी आणि सोडियमचा पुरवठा होतो. तसेच ग्लासभर शिकंजीमधून 60 कॅलरीज मिळतात.
- ताक : दह्यापासून तयार होणारे ताक वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येऊ शकते. त्यामुळे नियमित आहारात वेगावेगळ्या प्रकारे ताकाचा समावेश करा. यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते.
- लस्सी : ताकापेक्षा थोडी घट्ट आणि गोड म्हणजे लस्सी. हीटस्ट्रोकचा त्रास कमी करण्यासाठी आणि शरीरात उर्जा टिकून राहण्यासाठी मदत होते.
- कैरी पन्ह : वाफवलेली कैरी, लिंबाचा रस, पुदीना, मीठ आणि जिरंपूड याचं एकत्र मिश्रण म्हणजे पन्ह. शरीरातील इल्क्ट्रोलाईटसचे प्रमाण टिकवण्यासाठी त्याचा फायदा होतो.
- जल जीरा: आमचूर पावडर, जिरेपूड, काळंमीठ,पुदीना यांचे ग्लासभर पाण्यात मिश्रण एकत्र केल्यास जलजीरा बनते. उन्हाच्या दिवसात अॅन्टीऑक्सिडंटयुक्त समर कूलर उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करते.