कॉलेजवयीन मुलांमध्ये प्रेम आणि आकर्षण याबद्दल अनेक उत्सुकता असते. काही वेळेस केवळ एकतर्फी प्रेम असते तर काहीजणांना शारिरीक आकर्षण. पण तुम्हांला ती जवळीक प्रेम असल्याची खात्री पटल्यास अधिक वेळ घालवू नका. कारण प्रेमात केवळ मुलांनीच पुढाकार घ्यावा हा काही नियम नाही. म्हणूनच प्रेमात मुलींनी पुढाकार घेऊन तुमचं रिलेशनशीप टिकवण्यासाठी एक पाऊल पुढे या.
- मुलांना हिंट कळत नाही –
तरुणांमध्ये नात्यांबाबत गुंतागुंत अधिक असते. त्यामुळे रिलेशनशीपमध्ये मैत्री आहे की त्याहून अधिक काहीतरी हे समजणे कठीण असते. अनेकदा मुली थेट पुढाकार न घेता काही हिंट देतात. पण त्या सार्याच मुलांना योग्यप्रकारे कळतातच असे नाही म्हणून तुम्हांला खात्री वाटत असल्यास स्वतःहून पुढाकार घ्या. पण कसं सांगाल त्याला की, तो तुमचा ‘Mr. Right’ नाही.
- मुलांनी पुढाकार घ्यावा हा नियम नाही -
वर्षानुवर्ष रिलेशनशीपमध्ये पुढाकार मुलांकडूनच घेतला जातो. चित्रपटातूनही तसेच दाखवले जाते. परंतू हा काही नियम नाही. तुम्ही याला अपावाद ठरू शकता. ( नक्की वाचा : व्हॉट्सअॅपवरील या ’10′ चूका नात्यास ठरतात मारक !)
- समाधान -
मुलींनी प्रेमात पुढाकार घेऊन प्रपोज केल्यास आणि यशस्वी ठरल्यास तुमचा हक्काचा साथीदार तुम्हांला मिळाल्याचे समाधानही आयुष्यभर मिळेल.
- प्रेम आणि कुटुंब यांचा समतोल -
अनेकदा घरातल्या जबाबदार्या आणि सामाजिक दबाव मुलींवर अधिक असतो. पण ज्याअर्थी मुली प्रपोज करण्याचे धाडस करतात. आपल्या प्रेमासाठी उभ्या राहतात. त्याअर्थी त्याच्या परिणामांचादेखील विचार केलेला असतो. त्यांना घरातल्या व्यक्तींना अधिक चांगल्याप्रकारे समजावता येऊ शकते. ( नक्की वाचा : मुलींच्या या ’5′ वागणूकींवरून नका ठरवू त्यांची ‘नियत’! )
- स्वतःभोवतीच्या चौकटी मोडा -
मुली स्वतःभोवतीच्या सामाजिक भिंती मोडून पुढे आल्या तरच त्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाऊ शकतात. त्यामुळे हे काम मुलींचे आणि ते काम मुलांचे असा भेदभाव राहणार नाही.
- नात्यामध्ये तुम्ही आघाडीवर असाल -
मुलींनी प्रपोज केल्यानंतर पुढे भविष्यातील आगामी निर्णय घेतानादेखील तुम्हांला आघाडी घेता येईल. अनेकदा मुलींना दुय्यम स्थान दिले जाते. निर्णय लादल्यामुळे मुलींची मानसिक कुचंबणा होते.
- साथीदाराला स्पेशल फिल होईल -
रिलेशनशीपमध्ये मुलांवर प्रपोज करण्याचा आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याचा दबाव असतो. पण त्यांच्या मनातील ही खलबल ओळखून मुलींनीच एक पाऊल पुढे टाकल्यास त्यांच्यावरील ताण कमी होऊन ‘स्पेशल फील’ होईल.
- तुमच्या पिढीसाठी आदर्श निर्माण होईल -
मुलींनी पुढाकार घेऊन प्रेम जिंकल्यानंतर आपोआपच नात्यांमध्ये समतोल आणि समानता राखायला सुरवात होईल. ही सुरवात तुमच्यापासून होणं ही बाब तुमच्यासाठी अभिमानाची आणि पुढील पिढीसाठी आदर्शाची ठरेल.
- खूप वेळ वाचेल -
अनेकदा नकाराच्या भीतीने मुलंदेखील प्रपोज करायला धजावत नाहीत. परंतू तुम्हांला त्याच्याबद्द्ल खात्री वाटत असल्यास बिनधास्त प्रपोज करा. कारण हो म्हणाला तर फायद्याच असेल. आणि नकार आला तरीही तुम्ही त्या नात्यामधून लवकर बाहेर पडायला फायदेशीर ठरेल.
Image Source: Shutterstock