मुंबईचा उल्लेख कधीच न झोपणारे शहर म्हणून केले जाते. सतत धावणारी मुंबई आणि महाराष्ट्र आरोग्याच्या बाबतीत मात्र मागे पडला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रीयन लोकांना मधूमेहाचा धोका अधिक आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक, दिल्ली,पश्चिम बंगालच्या लोकांना मधूमेहाचा धोका असल्याचे seeDoc या हरियाणातील ऑनलाईन मेडिकल कॉऊन्सलेशनच्या अहवालात समोर आले आहे. तर उत्तरप्रदेश, हरियाणा आणि मध्यप्रदेश या भागातील लोकांना मधूमेहाचा त्रास तुलनेत कमी असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे.
गेल्या 3 महिन्यात 20,000 लोकांवर ऑनलाईन डायबिटीस असेसमेंंट टेस्टद्वारा हा अहवाल बनवण्यात आला असल्याचे सांगितले गेले आहे. टाईप 2 डायबेटीस वाढण्याचा धोका असलेल्या व्यक्तींमध्ये हाय बॉडी मास इंडेक्स, कमी शारिरीक श्रम, तणावाखाली काम करणे,अनुवंशिकता,हृद्यविकाराची लक्षणं आढळून आली आहेत. seeDoc या संस्थेतर्फे डिजिटल डायबेटीस टेस्ट बनवण्यात आल्या आहेत. ज्याद्वारा पुढील पाच वर्षात मधूमेहाचा वाढणारा धोका ओळखणे शक्य होईल. मग तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
ऑनलाईन मेडीकल टेस्टच्या संशोधन आणि निर्मीती कार्यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधक व डॉक्टरांचा समवेश होता. नियमित दिनक्रमाची माहिती, आरोग्य व लाईफस्टाईल विषयक घेतली जाणारी काळजी अशा माहितीच्या आधारे विशिष्ट व्यक्तीला मधूमेहाचा धोका किती प्रमाणात आहे ? याबद्दलचा निष्कर्ष काढला जातो. त्यानुसार रिस्क फॅक्टरची पातळीदेखील ठरवली जाते. (नक्की वाचा – मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज ! )
‘निरोगी व्यक्तीला मधू मेहाचे निदान झाल्यास डॉक्टर सोबत रुग्णांचाही त्याविरुद्ध लढण्याचा संघर्ष वाढतो. असे मत seeDoc च्या सह संस्थापिका आणि चीफ मेडिकल ऑफिसर अनुजा अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भारतातील वाढणारा मधूमेहाचा विळखा आटोक्यात ठेवण्यासाठी वेळीच निदान आणि पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच योगासनांनी करा ‘मधुमेहा’वर मात !