Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मधूमेहींनी आहारात दह्याचा समावेश करावा का ?

$
0
0

Read this in English 

 Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

भारतीय आहार हा दह्याशिवाय अपूर्णच आहे. दही थंड आणि पचायला हलके असल्याने त्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. पित्त, पचनाचे विकार अशा समस्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी तसेच उन्हाळ्यातील ’5′ त्रास दूर करण्यासाठी  दही फायदेशीर ठरते. पण रात्रीच्यावेळी दही खावे का ? हा प्रश्नदेखील अनेकांना सतावतो.

सामान्यांच्या आहारात दह्याचा समावेश आरोग्यदायी असला तरीही मधूमेहींच्या खाण्यावर बंधनं असल्याने त्यानी दही आहारात घेणे कितपत फायद्याचे आहे. यासाठी आम्ही आहारतज्ञ डॉ. निती देसाई यांच्याकडून घेतलेला सल्ला नक्कीच तुमच्यासाठीदेखील फायदेशीर ठरेल.

नीती देसाईंच्या मते, स्किम्ड मिल्कपासून बनवलेले दही मधूमेहींसाठी निश्चितच फायदेशीर आहे. यामुळे मधूमेहींमध्ये वाढणारा हृद्यरोगाचा धोका, कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता आटोक्यात राहण्यास मदत होते. नक्की वाचा : मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय

वैद्यकीय सल्ल्यांसोबतच काही संशोधनातूनदेखील दही मधूमेहींसाठी फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

1.एचडीएल म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण वाढते तर एलडीएलचे प्रमाण कमी होणे.  

कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी दही फायदेशीर ठरते. यामुळे मधूमेहींना जडणारा हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. जर्नल ऑफ़ रिसर्च अ‍ॅन्ड मेडीकल सायन्सच्या प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, टाईप 2 मधूमेहाच्या 44 रुग्णांवर एक प्रयोग करण्यात आला. यामध्ये 30-60 वयोगटातील एलडीएल वाढलेल्या रुग्णांचा समावेश होता. या रुग्णांचे दोन गट करण्यात आले. एकाला 300 ग्रॅम प्रोबायोटिक दही 8 आठवडे दिले. तर दुसर्‍या गटाला कन्वेशनल दही दिले. मात्र प्रोबायोटिक दह्यामुळे एलडीएलचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

2.अ‍ॅन्टी डाएबेटीक आहार म्हणून काम करते

जर्नल ऑफ़ मेडिसिनल फूडने उंदरांवर केलेल्या प्रयोगानुसार, फ्रुक्टोजयुक्त आहार दिलेल्या उंदरांना 10 ग्रॅम दही दिल्यास ग्लुकोजच्या कार्यावर सकारात्मक परिणाम दिसुन आले. म्हणजेच दही मधूमेहींचा त्रास कमी करण्यास मदत करतात. दह्याचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

References

[1]1: Mohamadshahi M, Veissi M, Haidari F, Javid AZ, Mohammadi F, Shirbeigi E.Effects of probiotic yogurt consumption on lipid profile in type 2 diabetic patients: A randomized controlled clinical trial. J Res Med Sci. 2014 Jun;19(6):531-6. PubMed PMID: 25197295; PubMed Central PMCID: PMC4155708.

[2] 1: Yadav H, Jain S, Sinha PR. Effect of skim milk and dahi (yogurt) on blood glucose, insulin, and lipid profile in rats fed with high fructose diet. J Med Food. 2006 Fall;9(3):328-35. PubMed PMID: 17004894.


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>