तुम्हांला खास वेळ काढून जिममध्ये घाम गाळायला आवडत नाही ? मग वजन घटवा ’8′ मजेशीर व्यायामप्रकारा संगे ! पण सायकलिंग हा एक देखील वजन घटवण्याचा एक स्वस्तात मस्त पर्याय आहे. आजकाल ट्राफिकच्या आणि टोलेजंग इमारतींच्या गर्दीने वेढलेल्या शहरांत सायकल चालवणे जरा कठीण आहे.परंतू काही आरक्षित ठिकाणी किंवा सोसायटीच्या आसपास तुम्ही सकाळ- संध्याकाळ सायकल चालवल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच तुमच्या स्नायूंना बळकटी मिळते. म्हणूनच सायकल चालवून परिणामकारक वजन घटवण्यासाठी या काही टीप्स अवश्य पाळा -
- योग्य वेगात सायकल चालवा
सायकल एकाच वेगात चालवू नका. वजन घटवण्यासाठी ती आरामदायक पद्धतीने चालवणे गरजेचे आहे. कमी अंतर अधिक वेगात आणि जास्त अंतर योग्य वेगात चालवल्यास अधिक परिणामकारक वजन घटवण्यास मदत होते.
- हळूहळू तुमचे लक्ष्य वाढवा
सायकलिंग करण्याची सुरवात सपाट रस्त्यावरून करा. हळूहळू तुम्ही टेकड्या, घाटाचा रस्ता अशा ठिकाणी चालवा. तसेच तुमचे अंतरही हळूहळू वाढवा.यामुळे तुमचे वजन कमी होण्यासोबतच तुमची सहनशक्ती,संयमही वाढण्यास मदत होईल.
- योग्य प्रकारची सायकल वापरा
बाजारात विविध प्रकारच्या सायकल उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्य प्रकारची सायकल निवडा. जर तुम्ही लांब पल्ल्यापर्यंत सायकल चालवणार असाल तर रेसर सायकल घ्यायला काहीच हरकत नाही.
- सायकल चालवताना शरीराची स्थिती योग्य ठेवा
वेगवेगळ्या सायकलप्रमाणे तुमची शारीरिक स्थितीही वेगळी असते. पण तुमच्या पाठीचा कणा ताठ असणे फार गरजेचे आहे. रेसर सायकल चालवतानाही तुम्हांला झुकावे लागले तरीही पाठीचा कणा ताठ ठेवा आणि कोअर मसल्सवर अधिक भर द्या. जर तुम्ही योग्य शारीरिक स्थितीत सायकल चालवू शकलात तर त्याचा तुम्हांला अधिक फायदा होऊ शकतो.
- सायकल चालवताना साथीदार निवडा आणि अधिक आनंद मिळवा
वजन घटवण्याच्या या मिशनमध्ये जर तुम्हांला असाच एखादा साथीदार भेटला तर तुमचा प्रवास अधिक रंजक होईल. यामुळे तुम्ही तुमच्या लक्ष्यापासून दूर हटणार नाही. तसेच तुमच्यातील हेल्दी कॉम्पिटिशन वजन घटवण्यासाठी तुम्हांला सतत प्रेरणा देईल. पण रेसिंग एखाद्या सुरक्षित ठिकाणी करावी अन्यथा अपघाताची शक्यता आहे.
- अचानक खाण-पिण कमी करू नका :
वजन घटवण्यासाठी तोंडावर ताबा ठेवणं गरजेचे आहे. परंतू अचानक आहार कमी करणे धोकादायक ठरू शकते. कारण जाणूनबुजून केलेल्या उपासमारीमुळे शरीरात साठवलेले फ़ॅट (मेद) कमी होते. पण अनावश्यक मेद कमी होण्याऐवजी स्नायू कमजोर होतात. पुन्हा नियमित आहार तुमचे घटलेले वजन पुन्हा वाढते. म्हणूनच लो कॅलरी पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.
- योग्य प्रमाणात पाणी प्या :
सायकल चालवताना तुम्हांला त्रास होऊ नये म्हणून योग्य प्रमाणात पाणी प्या. व्यायाम केल्यानंतर तुमच्या शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. तसे न झाल्यास थकवा जाणवणे, गोळे येणे अशा समस्या उद्भवतात. तसेच खाण्याच्या आणि पिण्याच्या इच्छेबाबत गोंधळून जाऊन अनेकदा सायकल चालवल्यानंतर पाणी किंवा एखादे पेय पिण्याऐवजी अधिक प्रमाणात काही पदार्थ खातात. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी तुमच्या शरीरात जाईल याकडे लक्ष द्या.
- इनडोर सायकलिंग टीप्स –
जर तुम्हांला रस्त्यावर सायकल चालवणे शक्य नसेल तर आजकाल अनेक जिममध्ये इनडोर सायकलिंगचा पर्याय उपलब्ध असतो. मशीनच्या आधारे नियंत्रित केलेल्या या व्यायामप्रकारात तुमच्या ह्र्द्याची गती व त्यानुसार तुम्ही किती कॅलरीज बर्न केल्या आहेत याचा अचूक निकाल दिला जातो. तुमच्या शारीरिक क्षमतेप्रमाणे त्यात विविध सेटिंग उपलब्ध असतात. त्यामुळे साध्या -सोप्या प्रकारापासून सुरवात करा आणि हळूहळू तुमचे आव्हान वाढवा.
स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा तीन टप्प्यातील सलग स्पर्धा वयाच्या 50 शीत जिंकणार्या मिलिंद सोमण आणि सलग 12 वेळेस आयर्नमॅन जिंकणारा डॉ. कौस्तुभ राडकर यांच्या प्रेरणा दायी कहाण्या जरूर वाचा.
संबंधित दुवे -
छायाचित्र सौजन्य – Getty Images
Source – cycle-to-lose-weight
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.